ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकात सहभागी होण्यासाठी अखेर पाकिस्तान क्रिकेट संघाला परवानगी देण्यात आली आहे. अडथळ्यांची शर्यत पार करून पाकिस्तान संघ या विश्वचषकासाठी भारतात येतोय. विश्वचषकातील बहुप्रतीक्षित भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे खेळला जाईल. तत्पूर्वी, भारतीय संघाचे माजी कर्णधार अनिल कुंबळे यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे.
या विश्वचषकात सर्वांची नजर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर असेल. जगातील सर्वात मोठे स्टेडियम असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे 14 ऑक्टोबर रोजी हा सामना होणार आहे. भारतीय संघाने आतापर्यंत विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध एकही पराभव पत्करलेला नाही. दोन्ही संघांदरम्यान वनडे विश्वचषकात सात सामने झाले असून, या सर्व सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. भारत-पाकिस्तान सामन्यावेळी एकंदरीत परिस्थिती कशी असते याबाबत बोलताना कुंबळे म्हणाले,
“या सामन्यावेळी प्रचंड दबाव दोन्ही संघांवर असतो. आमच्या वेळी म्हणत की एकवेळ तुम्ही केनियाविरुद्ध हरला तरी चालेल मात्र पाकिस्तानकडून पराभूत होऊ नका. भारत पाकिस्तान सामने असेच असतात मात्र खेळाडूंनी ते सामान्य सामन्याप्रमाणेच घ्यायला हवेत.”
भारत आणि पाकिस्तान हे विश्वचषकात भेटण्याआधी आशिया चषकात आमने-सामने येणार आहेत. 2 सप्टेंबर रोजी दोन्ही संघ कोलंबो येथे साखळी फेरीतील सामना खेळतील. त्यानंतर सुपर फोरमध्ये देखील ते भिडण्याची शक्यता आहे. तसेच दोन्ही संघांची कामगिरी उत्कृष्ट राहिल्यास अंतिम फेरीत देखील या संघांचा सामना होईल.
(Anil Kumble Talk About Pressure Of India Pakistan Match In World Cup)
महत्वाच्या बातम्या-
भारतीय चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! विश्वचषकाआधीच केएल राहुल दिसणार मैदानात
“मी नक्कीच तुम्हाला वर्ल्डकपमध्ये दिसणार”, कार्तिकच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया