---Advertisement---

मुंबईतील तापत्या ऊन्हात फॅन्सच्या डोळ्यांना थंडावा देणारे दृश्य! आई अंजलीसह सारा तेंडूलकर स्टेडियममध्ये

---Advertisement---

आयपीएल २०२२ च्या २६ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स संघ आमने सामने होते. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यातून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याचा मुलगा अर्जुन तेंडूलकर याला आयपीएल पदार्पण करण्याची संधी मिळेल, अशी चाहत्यांना अपेक्षा होती. मुंबई संघाने सामन्यापूर्वी तसे संकेतही दिले होते. परंतु तसे झाले नाही. मात्र या सामन्यासाठी तेंडूलकर कुंटुंब सहपरिवार उपस्थित होते.

सचिन (Sachin Tendulkar) आयपीएल २०२२साठी (IPL 2022) मुंबई संघाचा मार्गदर्शक आहे. त्यामुळे तो प्रत्येक सामन्यात आपल्या संघाला चीयर करण्यासाठी हजर असतो. बऱ्याचदा अर्जुनही (Arjun Tendulkar) डगआऊटमध्ये दिसला आहे. परंतु या सामन्यात आयपीएलप्रेमींचे आकर्षण ठरल्या, सचिनची पत्नी अंजली तेंडूलकर (Anjali Tendulkar) आणि मुलगी सारा तेंडूलकर (Sara Tendulkar). कारण त्या दोघीही मुंबईला चीयर करण्यासाठी आल्या होत्या. 

सारा आणि अंजली तेंडूलकरचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकांनी सारा मैदानात दिसल्यानंतर शुबमन गिलला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. 

https://twitter.com/Nocturnal__Rage/status/1515282296861237248?s=20&t=B9-RUJE8qqYScwjxkrzbTA

बाप आणि मुलगाची पहिल्यांदाच दिसले एकत्र
या सामन्यादरम्यान पहिल्यांदाच सचिन आणि अर्जुन एकत्र दिसले आहेत. सचिन (Sachin Tendulkar) आयपीएल २०२२साठी मुंबई संघाचा मार्गदर्शक आहे. त्यामुळे तो नेट्समध्ये खेळाडूंना मार्गदर्शन करताना बऱ्याचदा दिसला आहे. परंतु फार क्वचितच त्याला त्याचा मुलगा आणि वेगवान गोलंदाज अर्जुनसोबत (Arjun Tendulkar) पाहिले गेले आहे. अशात लखनऊविरुद्ध (MI vs LSG) डगआऊटमध्ये हे बाप-लेक एकत्र दिसल्याने चाहत्यांचे त्यांच्याकडे (Sachin & Arjun Together In Dugout) लक्ष वेधले गेले आहे.

मुंबई फ्रँचायझीने दिले होते संकेत
लखनऊविरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबई संघाने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये त्यांनी अर्जुनचा फोटो जोडत लिहिले होते की, मुंबई विरुद्ध लखनऊ सामन्यासाठी आमच्या डोक्यात असलेली व्यक्ती. या पोस्टनंतर अनेकांना वाटले होते की, अर्जुनला लखनऊविरुद्ध खेळवले जाईल. परंतु त्याला पुन्हा एकदा प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही.

मुंबईने २२ वर्षीय अर्जुनला मेगा लिलावात ३० लाख रुपयांना विकत घेतले होते. तो आयपीएल २०२१ मध्येही मुंबई संघाचा भाग होता, परंतु दुखापतीमुळे तो आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातून बाहेर झाला होता.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

रुसवा, फुगवा की संधी न मिळण्यामागची निराशा? वडील सचिनच्या शेजारी तोंड पाडून बसलेला दिसला अर्जुन

‘तो लहानपणीचा हिरो, त्याच्या ऍक्शनची कॉपी करण्याचाही केलेला प्रयत्न’, विराटच्या वॉर्नबद्दल भावना व्यक्त

संपूर्ण हंगामाला मुकल्यानंतर दीपक चाहरचा चाहत्यांसाठी खास मेसेज, म्हणतोय, ‘मला माफ करा…’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---