Thursday, May 19, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संपूर्ण हंगामाला मुकल्यानंतर दीपक चाहरचा चाहत्यांसाठी खास मेसेज, म्हणतोय, ‘मला माफ करा…’

संपूर्ण हंगामाला मुकल्यानंतर दीपक चाहरचा चाहत्यांसाठी खास मेसेज, म्हणतोय, 'मला माफ करा...'

April 16, 2022
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
Deepak-Chahar

Photo Courtesy: Twitter/ChennaiIPL


सध्या मुंबई आणि पुणे स्थित चार स्टेडियमवर आयपीएल २०२२ हंगामातील लीग स्टेजचे सामने खेळले जात आहे. चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर दुखापती अजून एकही सामना खेळू शकलेला नाहीये, अशात आता चाहत्यांसाठी खूपच निराशाजनक बातमी समोर आली आहे. चाहरची दुखापत गंभीर असल्यामुळे तो आयपीएलचा चालू असलेल्या संपूर्ण हंगाम खेळू शकणार नाहीये. त्याने स्वतः याविषयी दिलगिरी व्यक्त केली आहे.

आयपीएलच्या गव्हर्निंग काऊंसिलने दीपक चाहर (Deepak Chahar) आयपीएल २०२२चा संपूर्ण हंगाम खेळू शकणार नाही, असे म्हटले आहे. त्यानंतर दीपकने स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून याची पुष्टी केली आहे. अशात आता दीपकला मेगा लिलावात मिळालेल्या १४ कोटी रुपयांवर पाणी सोडावे लागणार यात कसलीही शंका नाही. सीएसकेने ही मोठी रक्कम खर्च करून त्याला संघात सामील केले होते.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

अधिकृत ट्विटर खात्यावरून खास पोस्ट शेअर करत दीपक चाहरने लिहिले की, “मला यासाठी माफी हवी आहे की, दुर्दैवाने दुखापतीमुळे मी आयपीएलच्या चालू हंगामात खेळू शकणार नाही. मी खरंच स्पर्धेत खेळू इच्छित होतो, पण आता मी नेहमीप्रमाणे अजून चांगला आणि मजबूत होऊन पुनरागमन करेल. नेहमीप्रमाणेच माझे समर्थन करण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी तुमचे आभार. तुमच्या प्रार्थनांची गरज आहे.”

pic.twitter.com/MDW6ZWeqtA

— Deepak chahar 🇮🇳 (@deepak_chahar9) April 15, 2022

दीपक चाहरने सोशल मीडिया पोस्टमधून चाहत्यांची माफी मागितल्यानंतर त्याच्या चाहत्यांच्या आणि नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. काहीजण आगामी टी२० विश्वचषकासाठी पुनरागमन करशील असा विश्वास व्यक्त करत आहेत, तर काहींच्या मते १४ कोटी रुपयांना चुना लागला आहे.

आयपीएल २०२२साठी चेन्नई सुपर किंग्जने संघात शक्य तेवढे कमी बदल केले आहेत. फ्रँचायझीने मेगा लिलावात त्यांच्या जुन्या खेळाडूंना खरेदी करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. याच कारणास्तव दीपक चाहरसाठी संघाने तब्बल १४ कोटी रुपये खर्च केले होते. तसेच, सलामीवीर फाफ डू प्लेसिसला खरेदी करण्याचाही सीएसकेने पूर्ण प्रयत्न केला होता. परंतु डू प्लेसिसला आरसीबीने सर्वात मोठी बोली लावून खरेदी केले आणि कर्णधार देखील बनवले.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

मुंबई इंडियन्ससाठी काय पण! टीम संघर्ष करत असताना सूर्यकुमारची लक्षवेधी प्रतिक्रिया, वाचा काय म्हणाला

‘गब्बर’ने लावले कॅप्टन मयंक अन् रबाडासह झक्कास ठुमके; भारताच्या विश्वविजेत्या खेळाडूची आली कमेंट

उमरान मलिकच्या जबरदस्त यॉर्करवर श्रेयर क्लिन बोल्ड, गोलंदाजी प्रशिक्षक स्टेनच्या आनंदाला नव्हत्या सीमा


ADVERTISEMENT
Next Post

मुंबईतील तापत्या ऊन्हात फॅन्सच्या डोळ्यांना थंडावा देणारे दृश्य! आई अंजलीसह सारा तेंडूलकर स्टेडियममध्ये

DC-vs-RCB

DC vs RCB| रिषभ पंतचा टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय; बेंगलोरच्या धाकड गोलंदाजाचे पुनरागमन, पाहा प्लेइंग इलेव्हन

MI-vs-LSG

केएल राहुलचे शतक आणि आवेश खानची शानदार गोलंदाजी; मुंबईला १८ धावांनी नमवत लखनऊ विजयी

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.