इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या हंगामाला जोरदार सुरुवात झाली आहे. या हंगामासाठी समालोचकांची यादी जाहीर करण्यात आली होती. तेव्हा त्या यादीत मयंती लंगरचे नाव नव्हते. हे पाहून क्रिकेट चाहते थोडे निराश झाल्याचे पहायला मिळाले होते. परंतु ती स्वतःला आयपीएल स्पर्धेपासून दूर ठेवूच शकत नाही. तिने केलेल्या एका ट्विटमुळे ती सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनून आहे.
आयपीएल २०२१ च्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हे संघ आमने सामने होते. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला २ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यांनतर मुंबई इंडियन्स संघाने कोलकाता नाईट रायडर्स संघाला १० धावांनी पराभूत करत हंगामातील पहिला विजय साजरा केला होता.
या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विजयाचा प्रबळ दावेदार होता. परंतु शेवटच्या षटकांमध्ये मुंबई इंडियन्स संघाने जोरदार पुनरागमन करत कोलकाता नाईट रायडर्स संघावर विजय मिळवला.
या सामन्यादरम्यान, प्रसिद्ध स्पोर्ट अँकर मयंती लंगरने रोहित शर्माला अनुसरून एक ट्विट केले होते. ज्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. या ट्विटमुळे सोशल मीडियावर प्रतिक्रियांचे वादळ आले होते. त्यामुळे काही वेळानंतर तिने हे ट्विट डिलिट केले होते.
तिने ट्विट करत लिहिले होते की, “जर मुंबई इंडियन्स २०० पेक्षा अधिक धावा करतील, तर मला वडापाव पाहिजे. कारण आपल्याला हिटमॅनचा सन्मान करायला हवं.” या ट्विटमुळे तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे. यासोबतच तिचा पती स्टुअर्ट बिन्नीवरही मिम्स बनून शेअर केले जात आहेत.
https://twitter.com/_dreamer__neha/status/1381958323092643846?s=20
https://twitter.com/Aj451098/status/1381946983842160645?s=20
https://twitter.com/Solskjaer69420/status/1381959848259059722?s=20
https://twitter.com/Anubhav_MSDIAN_/status/1381938974541766659?s=20
मुंबई इंडियन्सचा पुढील सामना १७ एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी ७.३० वाजता या सामन्याची सुरुवात होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
प्रेयसी नव्हे तर ‘हे’ माझं पहिलं प्रेम; ईशान किशनच्या खुलास्यावर गर्लफ्रेंड आदिती म्हणते…
मिस्टर अँड मिसेस बुमराहच्या लग्नाला एक महिना पूर्ण; संजना म्हणते, ‘या’ गोष्टीची खूप आठवण येतेय






