रणजी ट्रॉफीचा सहावा टप्पा सुरू झाला आहे. यावेळी या स्पर्धेत अनेक स्टार खेळाडू खेळताना दिसत आहेत. दरम्यान, बडोद्याविरुद्धच्या सामन्यापूर्वी महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार फलंदाज अंकित बावणे या सामन्यात खेळू शकणार नाही. खरंतर बावणेवर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. म्हणूनच तो या सामन्यात भाग घेऊ शकणार नाही. पंचांच्या निर्णयाचा निषेध केल्याबद्दल आणि बाद दिल्यानंतरही मैदान न सोडल्याबद्दल त्याच्यावर बंदी घालण्यात आली आहे. ही घटना पाचव्या फेरीतील सामन्याशी संबंधित आहे जेव्हा महाराष्ट्र संघ सर्व्हिसेस विरुद्ध खेळत होता.
नोव्हेंबरच्या सुरुवातीला सर्व्हिसेसविरुद्ध खेळल्या गेलेल्या या सामन्यात बावणे महाराष्ट्राचे नेतृत्व करत होता. मीडियारिपोर्ट्सनुसार, क्षेत्ररक्षकाने चेंडू पकडण्यापूर्वीच तो जमिनीवर पडला होता, तरीही त्याला स्लिपमध्ये झेल देऊन बाद देण्यात आले. हा सामना थेट दाखवला जात नव्हता आणि त्यामुळे पुनरावलोकन प्रणाली (Review system) देखील उपलब्ध नव्हती. जरी त्याला हवे असले तरी, बावणे रिव्ह्यू मागू शकत नव्हता.
परंतू, त्याला मैदान सोडायचे नव्हते. त्यांने या निर्णयाविरुद्ध 15 मिनिटे निषेध केला. ज्यामुळे खेळही थांबवण्यात आला. नंतर, सामनाधिकारी आणि महाराष्ट्र प्रशिक्षकांच्या हस्तक्षेपानंतर, बावणे मैदानाबाहेर गेला आणि सामना पुन्हा सुरू होऊ शकला. त्यावेळी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारत अ संघाकडून खेळणाऱ्या ऋतुराज गायकवाडनेही त्याच्या सोशल मीडियावर रिप्ले शेअर करून या निर्णयाचा निषेध केला होता.
या सामन्यानंतर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफी खेळवण्यात आली. अंकित बावणे या दोन्ही स्पर्धांमध्ये महाराष्ट्राकडून खेळताना दिसला. आता रणजी ट्रॉफी परत येताच त्याच्यावर कारवाई करण्यात आली. बावणेची बंदी महाराष्ट्रासाठी मोठा धक्का आहे कारण त्याने या हंगामात संघासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. बावणेने या हंगामात 361 धावा केल्या आहेत. ज्यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे.
हेही वाचा-
पाकिस्तानच्या गोलंदाजानं केला ‘पुष्पा’ स्टाईल सेलिब्रेशन, VIDEO भन्नाट व्हायरल
रणजीमध्येही रोहित शर्मा फ्लाॅप, गिल-जयस्वालनेही गंभीरची डोकेदुखी वाढवली
232 च्या स्ट्राईक रेटने 79 धावा केल्या, तरीही अभिषेक शर्मा नव्हे तर हा खेळाडू ठरला सामनावीर