मुंबई। बुधवारी(3 एप्रिल) वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना पार पडला. या सामन्यात मुंबईने 37 धावानी विजय मिळवत या मोसमातील दुसरा विजय मिळवला आहे.
पण या सामन्यात जेव्हा मुंबईचा संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला त्यावेळी मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा उजवा डोळा सुजलेला दिसत होता. तसेच या डोळ्याच्या खाली काळा डागही दिसत होता. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला.
बुमराहला ही दुखापत मंगळवारी मुंबई संघाच्या सराव सत्रादरम्यान झाली आहे. या सराव सत्रादरम्यान झेल घेताना चेंडू बुमराहच्या डोळ्याच्या खाली लागला. त्यामुळे त्याला डोळा सुजला होता. पण त्यानंतर लगेचच त्याच्यावर उपचार करण्यात आल्याने तो चेन्नई विरुद्धच्या सामन्यात बुधवारी खेळला.
बुमराहला याआधीही मुबंई इंडियन्सच्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळताना खांद्याची दुखापत झाली होती. बुमराहच्या या दोन्ही दुखापती गंभीर नसल्या तरी भारतीय संघासाठी चिंता वाढवणाऱ्या आहेत. कारण पुढील महिन्यात विश्वचषक सुरु होणार आहे आणि बुमराह हा भारतीय संघाचा महत्त्वाचा भाग आहे.
आयपीएलच्या आधी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने भारतीय खेळाडूंना हुशारीने खेळ करा आणि विश्वचषकाची संधी गमावू नका असा सल्ला दिला होता. तसेच त्याने सांगितले होते की भारतीय संघाचे फिजिओ पॅट्रिक यांच्या संपर्कात रहा.
https://twitter.com/SPOVDO/status/1113505342988660736
महत्त्वाच्या बातम्या –
–१२ तासांत लसिथ मलिंगा खेळला दोन सामने, एक भारतात दुसरा श्रीलंकेत
–पोलार्डने आयपीएल २०१९ मधील घेतला आत्तापर्यंतचा सर्वात अफलातून कॅच, पहा व्हिडिओ
–धोनीला भेटायला आली एक खास चाहती, धोनीनेही सेल्फी घेत केले खूश, पहा व्हिडिओ






