महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन यजमान पदाखाली मुंबई महानगरपालिकाच्या वतीने मुंबई महापौर चषक कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार होत. मात्र करोना व्हायरस मुळे स्पर्धेला स्थगिती देण्यात आली आहे.
मुंबई महापौर चषक कबड्डी स्पर्धा २०२० पुरुष व्यावसायिक व स्थानिक महिला गट दिनांक २६ मार्च २०२० ते २९ मार्च २०२० या कालावधीत छत्रपती संभाजी राजे क्रीडांगण मुलुंड येथे आयोजित करण्यात आली होती.
परंतु करोना व्हायरसच्या संक्रमनामुळे शासनाच्या आदेशानुसार व मुंबई महापौरांनी घेतलेल्या निर्णयानुसार सदर स्पर्धा पुढील निर्देश मिळेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. याची सर्व संघानी नोंद घ्यावी ही नम्र विनंती पुढील तारखा लवकरच कळविण्यास येतील.