कोलकाता। शुक्रवारी आयपीएलला खऱ्या अर्थाने दुसरा सुपरमॅन मिळाला. राशीद खान असे त्याचे नाव. एकाच सामन्यात ह्या पठ्ठ्याने असे काही कारनामे केले की जे कुणालाच गेल्या ११ हंगामात करता आले नाही.
शुक्रवारी ईडन गार्डन स्टेडियमवर पार पडलेल्या आयपीएल २०१८च्या क्वालिफायर २ सामन्यात सनरायझर्स हैदराबादने कोलकातावर १४ धावांनी विजय मिळवत दुसऱ्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे.
आज हैद्राबादकडून रशीद खानने अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करताना हैद्राबादच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. त्याने आज फलंदाजी करताना १० चेंडूत नाबाद ३४ धावा केल्या. तर गोलंदाजी करताना १९ धावा देत ३ विकेट्स घेतल्या.
विशेष म्हणजे या सामन्यात त्याने २ झेल देखील घेतले. त्याने कालच्या सामन्यात सर्वाधिक स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. गोलंदाजी करताना सर्वात कमी इॅकाॅनाॅमीने धावा दिल्या. ४ षटकांत केवळ १९ देत ३ विकेट्स मिळवल्या. एका खेळाडूला धावबाद केले.
Two major wickets for @rashidkhan_19. He's on a roll here at the Eden Gardens.#Qualifier2 #SRHvKKR pic.twitter.com/fclFSJc7D3
— IndianPremierLeague (@IPL) May 25, 2018
यामुळे एका क्रिकेटपटूला मैदानावर जे काही करता येऊ शकते ते सर्व काल त्याने करुन दाखवले. त्याची हीच कामगिरी पाहुन अनेक दिग्गजांनी त्याचे कौतुक केले आहे. त्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर, टाॅम मुडी, व्हीव्हीएस लक्ष्मण तसेच शेन वार्न सारख्या दिग्गजांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–ना वार्न- ना मुरली, सचिन म्हणतो हा आहे जगातील सर्वोत्तम गोलंदाज
–आयपीएलमध्ये सहाव्यांदा झाला असा कारनामा
–IPL 2018: हैदराबाद दुसऱ्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात
–इतिहास घडणार, भारतीय खेळाडू देशाबाहेरील या लीगमध्ये खेळणार!
–आयपीएलमधील ४ खऱ्या आॅलराउंडरची नावे वाचून तुम्हाला धक्काच बसेल
–टाॅप ५- एकही शतक न करता या दिग्गजांनी केल्या आयपीएलमध्ये ४ हजार धावा