---Advertisement---

‘आमची भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलियाशी बरोबरीच होऊ शकत नाही’, खुद्द दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूचे भाष्य

On: सोमवार, ऑगस्ट 15, 2022 5:46 PM
anrich nortje
---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एन्रिच नॉर्किया याने त्याच्या संघाने कमीत कमी कसोटी सामने खेळल्याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारखे मोठे संघ जास्त कसोटी सामने खेळतात, पण दक्षिण आफ्रिका संघाला मात्र फार कमी कसोटी सामने खेळायला मिळतात, जे बरोबर नाही. नॉर्कियाला असे वाटते की, दक्षिण आफ्रिकेनेही जास्तीत जास्त कसोटी सामने खेळायला पाहिजेत. कारण जर संघ जास्त कसोटी सामने खेळणारच नाही, तर क्रमवारीत ते वरती जाऊ शकणार नाहीत. 

दक्षिण आफ्रिका संघाने (South Africa) २०१९ ते २०२१ या २ वर्षांच्या कालावधीत फक्त १८ कसोटी सामने खेळले आहेत. तर भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघांनी दक्षिण आफ्रिकेच्या तुलनेत भरपूर सामने खेळले आहेत. इंग्लंडने सर्वाधिक ३६, भारताने २६ आणि ऑस्ट्रेलियाने २० कसोटी सामने खेळले आहेत.

स्पोर्ट्समेलशी बोलताना नॉर्किया (Anrich Nortje) म्हणाला की, “दक्षिण आफ्रिका संघातील सक्रिय खेळाडू माजी खेळाडूंइतके महान नाही बनू शकणार. कारण त्यांना फार कमी संधी मिळत आहेत. जेव्हा तुम्हाला जास्त सामने खेळायला मिळतात, तेव्हाच तुम्हाला महान बनण्यासाठी काहीतरी करता येऊ शकते.”

“जर आम्ही एका वर्षात फक्त ६ सामने खेळत असू आणि इतर संघ वर्षभरात १५ सामने खेळत असतील, तर मग बरोबरी नाही होऊ शकत. आमच्या आधीच्या पिढीतील क्रिकेटपटू जितके मोठे खेळाडू बनले, तितके मोठे आमच्या पिढीतील खेळाडूंना बनता येणार नाही. कारण आम्ही ३ वर्षांमध्ये फक्त १८ कसोटी सामने खेळत आहोत. आम्हाला क्रिकेटच्या प्रत्येक स्वरूपात अव्वल संघ बनायचे आहे. आम्हाला खूप क्रिकेट खेळायचे आहे. आम्ही जास्त क्रिकेट खेळू इच्छित आहोत, ना की फक्त २ सामन्यांची कसोटी मालिका,” असे नॉर्किया म्हणाला.

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

गप्टीलने रोहितचा बदला विंडीज विरुद्धच घेतला, वाचा कसं आहे कनेक्शन

मार्कस स्टॉयनिसने उडवली पाकिस्तानी गोलंदाजाची खिल्ली! व्हिडिओ तुफान व्हायरल

‘इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूला आपल्या मायदेशासाठी खेळायचं होतं क्रिकेट!’ माजी कर्णधाराने केलाय खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---