आयपीएलच्या 13 व्या हंगामातील 42 वा सामना शनिवारी(24 ऑक्टोबर) दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झाला. या सामन्यात दिल्लीच्या वेगवान गोलंदाजांनी सुरुवातीला उत्कृष्ट गोलंदाजी केली. अनुभवी वेगवान गोलंदाज एन्रीच नॉर्किएने डावाच्या दुसऱ्याच षटकात कोलकाताचा सलामीवीर शुबमन गिलला तंबूत पाठवले. त्यानंतर डावाच्या सहाव्या षटकात राहुल त्रिपाठीला यॉर्कर चेंडू फेकून त्रिफळाचित केले. हा चेंडू अचूक टप्प्यावर पडला आणि त्रिफळा उडाल्या.
एन्रीच नॉर्किएने त्रिपाठीला फेकलेल्या चेंडूचा वेग ताशी 148.3 किमी होता. त्रिपाठीला हा चेंडू समजलाच नाही. त्याने फटका खेळण्यासाठी बॅट वर केली आणि तो त्रिफळाचित झाला.
https://twitter.com/ipl2020highlite/status/1319955231434682368
विशेष म्हणजे नॉर्किए यंदाच्या आयपीएल हंगामात शानदार कामगिरी करत असून तो त्याच्या गोलंदाजीतील वेगामध्ये सातत्य ठेवत आहे. याआधी राजस्थानविरुद्धच्या सामन्यादरम्यान आयपीएलच्या इतिहासातील वेगवान चेंडूही त्यानेच फेकला आहे. त्या चेंडूचा ताशी वेग 156.22 किलोमीटर होता.आयपीएल 2020 मध्ये, नॉर्किएने फेकलेले ३ चेंडू या स्पर्धेतील सर्वात वेगवान चेंडू आहेत.
शुक्रवारी प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने 20 षटकांत 194 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल दिल्लीला केवळ 135 धावाच करता आल्या. दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने सर्वाधिक 47 धावा केल्या. युवा फलंदाज रिषभ पंतने 27 धावांचे योगदान दिले.या दोघांव्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजाला अधिक काळ खेळपट्टीवर टिकताच आले नाही.
दिल्लीने हा सामना जिंकला असता, तर संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला असता. तसेच आयपीएल 2020 च्या प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी केकेआरला या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक होते. ते सध्या गुणतालिकेत 12 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
दिल्लीच्या फलंदाजांना लोळवणारा मिस्ट्री स्पिनर तुम्हाला माहित आहे का? पहिल्यांदाच घेतल्यात ५ विकेट्स
करामती खान! राशिदच्या न उमगणाऱ्या फिरकीवर केएल राहुलची दांडी गुल, पाहा व्हिडिओ‘
ट्रेंडिंग लेख –
कोण होत्या ‘त्या’ ६ मिस्ट्री गर्ल, ज्यांना आयपीएलदरम्यान काही तासातच मिळाली प्रसिद्धी
एक खाणकामगाराचा मुलगा ते भारतीय संघातील प्रमुख गोलंदाज
अतिशय गरीबीतुन पुढे आलेले ५ भारतीय क्रिकेटपटू, आज आहेत करोडपती