---Advertisement---

IND vs ENG: मँचेस्टरमध्ये ऐतिहासिक क्षण! अंशुल कंबोजच्या पदार्पणाने 35 वर्षांनंतर भारतीय कसोटी इतिहासाची पुनरावृत्ती

On: बुधवार, जुलै 23, 2025 9:21 PM
---Advertisement---

Anshul Kamboj Debut: भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेचा चौथा सामना मँचेस्टरमध्ये खेळला जात आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 3 बदल झाले आहेत. भारतीय संघाकडून या सामन्यात 24 वर्षीय वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजला पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. त्याच्या पदार्पणासोबतच मँचेस्टरमध्ये 35 वर्षांपूर्वीची एक जुनी गोष्ट पुन्हा घडली आहे. (Anshul Kamboj debut)

खरं तर, 35 वर्षांनंतर या मैदानावर कोणत्याही भारतीय खेळाडूने पदार्पण केले आहे. कंबोजपूर्वी, भारतीय संघाचे माजी दिग्गज लेग स्पिनर अनिल कुंबळे यांनी 1990 मध्ये याच मैदानावर कसोटी पदार्पण केले होते. (Manchester Test India England)

अनिल कुंबळे आणि अंशुल कंबोज यांच्यात आणखी एक खास कनेक्शन आहे. (Anil Kumble connection) या दोन्ही गोलंदाजांच्या नावावर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये एका डावात 10 विकेट्स घेण्याचा रेकाॅर्डही नोंद आहे. कुंबळेने 1999 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करत एका डावात सर्व 10 विकेट्स घेतल्या होत्या. तर अंशुल कंबोजनेही 2024 मध्ये केरळविरुद्ध फर्स्ट-क्लास क्रिकेटमध्ये एका सामन्यात सर्व 10 विकेट्स आपल्या नावावर केल्या होत्या.

अंशुल कंबोजने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये आतापर्यंत 24 सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 79 विकेट्स घेतल्या आहेत. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 25 सामन्यांमध्ये 40 विकेट्सची नोंद आहे. टी20 मध्ये त्याने 34 विकेट्स घेतल्या आहेत. अंशुल कंबोजला इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभवही आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी तो इंडिया ‘ए’ साठी इंग्लंड लायन्सविरुद्ध 2 फर्स्ट क्लास सामने खेळला होता, ज्यात त्याने 5 विकेट्स घेतल्या होत्या. आता तो मँचेस्टर कसोटी सामन्यात कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (Anshul Kamboj stats)

मँचेस्टर कसोटी सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, भारतीय संघाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 3 बदल केले आहेत. करुण नायर, जो या मालिकेत आतापर्यंत 3 सामन्यांमध्ये विशेष काही करू शकला नव्हता, त्याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर काढण्यात आले आहे. त्याच्या जागी साई सुदर्शनला संधी मिळाली आहे. तर दुखापतग्रस्त नितीश कुमार रेड्डी आणि आकाश दीपच्या जागी शार्दुल ठाकूर आणि अंशुल कंबोजला संघात समाविष्ट केले आहे. (Team India Playing XI)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---