मुंबई | प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामाचा लिलाव ३० आणि ३१ मे रोजी मुंबईत पार पडणार आहे. एकूण ४२२ खेळाडू यंदाच्या हंगामात लिलावाच्या प्रक्रियेमधून जाणार आहे. त्यात अनेक दिग्गजांचाही समावेश आहे.
या लिलावातील एक खास गोष्ट म्हणजे तीन खेळाडू असे आहेत जे आयपीएलचे पाचही हंगाम एकाच संघाकडून खेळले आहेत. यात यु मुंबाचा अनुप कुमार, जयपुर पिंक पॅंथरचा जसवीर सिंग आणि तेलुगू टायटन्सचा राहुल चौधरी हे ते तीन खेळाडू आहेत. आयपीएलमध्ये विराट कोहली हा ११ हंगामात एकाच संघाकडून खेळला आहे.
राहुल चौधरीने तेलुगू टायटन्सकडून खेळताना ७९ सामन्यात ७१० गुण मिळवले आहेत. या स्पर्धेत सर्वाधिक गुण घेणारा खेळाडू म्हणुन त्याला ओळखले जाते. ७१० गुणांपैकी त्याने ६६६ गुण त्याने रेडमधून तर ४४ गुण टॅकलमधून कमावले आहे. विराट कोहलीप्रमाणेच एकाच संघाकडून सर्व हंगामात खेळूनही राहुलला संघाला एकदाही विजेतेपद मिळवुन देता आले नाही.
अनुप कुमारने यु मुंबाकडून एकुण ७८ सामन्यात ५४६ गुणांची कमाई केली आहे. त्याने ४८९ गुण रेडमधून तर ५७ गुण टॅकलमधून कमावले आहे. या ५ हंगामात मुंबई २०१५ला विजेती ठरली.
जयपुर पिंक पॅंथरच्या जसवीर सिंगने ६१ सामन्यात ३६६ गुण कमावले आहेत. त्यातील ३३८ रेडमधून तर २८ गुण टॅकलमध्ये कमावले आहेत. २०१४ ला जयपुर पिंक पॅंथर संघ या स्पर्धेचा विजेता ठरला होता.
विशेष म्हणजे या तिघांनी आपल्या संघाकडून पाचही मोसमात खेळूनही त्यांना आपल्या संघाने लिलावापुर्वी संघात कायम ठेवले नाही.
तेलुगू टायटन्सने नीलेश साळुंखे, मोहसीन मॅघसॉडलो जाफारी संघात कायम ठेवताना राहुलवर मात्र विश्वास दाखवला नाही. यु मुंबा यावेळी नव्याने संघबांधणी करणार असल्याच त्यांनी अनुपसहीत कोणताही खेळाडू कायम न करण्यावरुन स्पष्ट दिसत आहे तर मुंबई प्रमाणेच जयपुर संघानेही कोणत्याही खेळाडूला कायम ठेवले नाही.
यामुळे आता ३० आणि ३१ मे रोजी होत असलेल्या लिलावाला हे संघ या खेळाडूंना संघात परत घेणार की नाही हे पहाणे मनोरंजक ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–प्रो कबड्डी- जाणून घेऊयात लिलवासंदर्भातील सर्व नियमावली
–या दिग्गज माजी खेळाडूची पुणेरी पलटणच्या प्रशिक्षकपदी निवड
–महाराष्ट्राच्या या तीन खेळाडूंवर लागु शकते प्रो-कबड्डीत सर्वाधिक बोली
–संपुर्ण यादी- प्रो कबड्डी लिलावासाठी महाराष्ट्राचे हे ४२ खेळाडू आहेत उपलब्ध
–आयपीएलप्रमाणेच प्रो-कबड्डी लिलावातही वापरता येणार आरटीएम
–कबड्डी- ई भास्करन तमिल थलाइवाजचे मुख्य प्रशिक्षक
–प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामासाठी ९ संघानी २१ खेळाडूंना केले कायम