---Advertisement---

अनुष्काने विचारलं 150 च्या स्पीडचा बाउन्सर की यॉर्कर, कशाची भीती वाटते? ,पाहा विराटने काय दिलं उत्तर

Virat Kohli Anushka Sharma
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा महान फलंदाज विराट कोहली हा सध्याच्या काळातील सर्वात यशस्वी क्रिकेटपटूंपैकी एक आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याची जादू पाहायला मिळते. कोहलीने आतापर्यंत क्रिकेट विश्वातील अनेक नामवंत गोलंदाजांना आपल्या बॅटने पराभूत केले आहे. किंग कोहलीची विकेट घेण्यासाठी सर्व गोलंदाज नेहमीच आतुर असतात.

मात्र, यासाठी त्यांना खूप मेहनत घ्यावी लागते. तो कधीच आपली विकेट इतक्या सहजपणे गमावत नाही. आत्तापर्यंत असे अनेक गोलंदाज आले आहेत ज्यांनी आपल्या गोलंदाजीने माजी भारतीय कर्णधाराला त्रास दिला. दरम्यान, त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये विराट कोहली याने सांगितले की, त्याला या दोन्हींपैकी कशाची भीती वाटते, 150 किमी/तास वेगाने यॉर्कर किंवा बाऊन्सर.

एका मोठ्या ब्रँडच्या शूटिंगदरम्यान विराट कोहली (Virat Kohli) पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) सोबत दिसला होता. शूटिंगदरम्यान दोघांनी एकमेकांना काही मनोरंजक प्रश्न विचारले. दरम्यान, बॉलीवूड अभिनेत्रीने विराटला विचारले की, “तुला कशाची जास्त भीती वाटते, 150 किमीच्या वेगाने फेकलेला बाउन्सर की त्याच वेगाने फेकलेला यॉर्कर?”

याला प्रत्युत्तर देताना भारतीय फलंदाज म्हणाला, “बाऊंसर, मी दोन्ही सांगू शकत नाही, पण बाऊन्सर जरा अवघड आहे.” या प्रश्नोत्तराच्या सत्रात विराट कोहलीने अनुष्काला क्रिकेटशी संबंधित तिच्या आवडत्या आठवणीबद्दल सांगण्यास सांगितले. इतर भारतीय क्रिकेट चाहत्यांप्रमाणेच अनुष्कानेही याला प्रतिसाद म्हणून टी२० विश्वचषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना निवडला. त्या सामन्यात किंग कोहलीने भारतीय संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला होता. (Anushka asked 150 speed bouncer or yorker what are you afraid of Virat gave a funny answer watch the video)

म्हत्वाच्या बातम्या

बांगलादेशविरुद्ध ऑस्ट्रेलियाची प्रथम गोलंदाजी, सेमीफायनलसाठी दोन स्टार खेळाडू विश्रांतीवर
ऑस्ट्रेलियन कर्णधाराच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर भारतीय फलंदाजाने लिहिली हृदयस्पर्शी पोस्ट; म्हणाली, ‘या लिजेंड खेळाडूचा…’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---