सध्या भारतीय पुरुष क्रिकेट संघ युएई येथे टी२० विश्वचषक स्पर्धा खेळत आहे. संघाला स्पर्धेच्या सुरुवातीला सलग दोन सामन्यात पराभूत व्हावे लागले आहे. दुसरीकडे सध्या भारतात देशांतर्गत क्रिकेटला सुरुवात झाली असून, एकोणीस वर्षाखालील मुलींच्या चॅलेंजर्स ट्रॉफीतील सामने खेळले जात आहेत. भारत महिला अ व भारत महिला ब यांच्यातील सामन्यात अनुष्का शर्मा या युवा महिला अष्टपैलू खेळाडूने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर सोशल मीडियावर ती चांगलीच ट्रेंड होऊ लागली.
अनुष्काची शानदार कामगिरी
जयपूर येथे खेळल्या गेलेल्या एकोणीस वर्षाखालील मुलींच्या चॅलेंजर्स ट्रॉफी स्पर्धेतील भारत अ महिला व भारत ब महिला या संघांमध्ये सामना झाला. भारत ब संघाचे नेतृत्व करणारी मध्य प्रदेशची अनुष्का ब्रिजमोहन शर्मा ही संपूर्ण सामन्यात चांगलीच चर्चेत राहिली. प्रथम फलंदाजी करताना तिने ७२ धावांची शानदार खेळी केली. त्यानंतर, गोलंदाजी करताना तिने पाच बळी घेतले. तर, दोन फलंदाजांना बाद करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या कामगिरीमुळे भारत महिला ब संघाने ९२ धावांनी मोठा विजय साकार केला.
Anushka Sharma 52 runs in 88 balls (5×4, 1×6) India B 140/0 #U19ChallengerTrophy
— BCCI Women (@BCCIWomen) November 2, 2021
चर्चेत आली अनुष्का
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून अनुष्काच्या खेळाविषयी ट्विट करण्यात आल्यानंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले. कारण, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या पत्नीचे नाव देखील अनुष्का शर्मा असेच आहे.
बीसीसीआयच्या ट्विटनंतर एका चाहत्याने विराटचे पाठमोरे छायाचित्र ट्विट करत लिहिले, ‘तुम्ही मला सांगितले का नाही अनुष्का सामना खेळायला गेली आहे. वामीका रडते ना’
https://twitter.com/UN_PrEdiTAble/status/1455418127253078017
तर दुसर्या एका चाहत्याने विराटची चकीत भावमुद्रा ट्विट करत लिहिले, ‘अबे हिने क्रिकेट कधीपासून खेळायला सुरुवात केली’
Abey isne Cricket khelna kab se shuru kar diya : pic.twitter.com/olGgNLw0Ae
— Kushagra (Memefor.tress) (@4kushagra5) November 2, 2021
अन्य एका चाहत्याने ट्विट करत लिहिले, ‘जेव्हा पती फॉर्ममध्ये नसतो तेव्हा बायकोला मैदानात उतरावे लागते.’
https://twitter.com/MlonMast/status/1455440864201699330
सध्या विराट भारतीय संघासह टी२० विश्वचषक खेळत आहे. भारताचा पुढील सामना ३ नोव्हेंबरला अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
गांगुली पुन्हा गोत्यात! गमवावे लागणार बीसीसीआय अध्यक्षपद?
चक्रवर्तीची सुट्टी अन् अश्विनचे कमबॅक? अफगानिस्तान विरुद्ध अशी असू शकते भारताची ‘प्लेइंग इलेव्हन’