भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा आणि एमएस धोनीची पत्नी साक्षी धोनी या दोघींमध्ये एक खास नाते आहे. या दोघींनी एकाच शाळेत शिक्षण घेतले असल्याने या दोघीही स्कूलमेट होत्या.
या दोघीही आसाममधील मार्घेरिता येथील सेंट मेरी स्कूलमध्ये शिकल्या होत्या. 2013 मध्ये अनुष्का आणि साक्षी यांच्यातील संवादादरम्यान त्या दोघीही एकाच शाळेत शिकल्या असल्याचे त्यांना समजले होते.
त्यांचे काही फोटोही त्यावेळी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. इंडिया टूडेला दिलेल्या एका मुलाखतीत अनुष्काने याबाबत खूलासा केला होता. तीने म्हटले होते की ‘साक्षी आणि मी आसाममधील एका छोट्या गावात एकत्र राहत होतो. जेव्हा तिने (साक्षी) सांगितले की ती कोठे राहत होती तेव्हा मी म्हणाले वाह! मी सुद्धा तिथे राहिले आहे. तेव्हा तिने सांगितले की ती कोणत्या शाळेत शिकली त्यावेळी मी म्हणाले, मी पण याच शाळेत गेले आहे.’
‘त्यानंतर मला एक फोटो सापडला ज्यात साक्षीने राजकुमारीसारखा आणि मी माझी आदर्श माधूरीप्रमाणे घागरा असा पोषाख घातला होता. साक्षी ही खूप मजेशीर आहे,’ असे पुढे अनुष्काने म्हटले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
ऐकलंत का! मिस्टर अँड मिसेस कोहलीला ‘या’ अभिनेत्रीच्या पतीने दिला होता इटलीत लग्न करण्याचा सल्ला