भारतात सध्या कोरोनाच्या संकटाने धोक्याची परिसीमा गाठली आहे. त्यामुळे सध्या अनेकजण मदतीसाठी पुढे येत आहे. यात अनेक क्रिकेटपटू, सिनेस्टार यांचा समावेश आहे. नुकताच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी देखील कोरोना व्हायरसच्या विरुद्धच्या लढाईत मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांच्या या मदतीच्या अभियानाला आता गती मिळताना दिसत आहे.
विराट आणि अनुष्काने केट्टोसोबत मिळून एक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेद्वारे जमा केली जाणारी रक्कम एसीटी ग्रँड्सला दिली जाईल. एसीटी ग्रँड्स ऑक्सिडन आणि इतर वैद्यकिय सेवा पुरवण्याच्या क्षेत्रात काम करते. विराट आणि अनुष्का ७ दिवसांची ही मोहिम राबवत आहे. या मोहिमेअंतर्गत ७ कोटी रुपये उभे करण्याचे लक्ष्य आहे. विराट आणि अनुष्काने या मोहिमेसाठी २ कोटी रुपये दान दिले आहेत.
त्य़ानंतर गेल्या २४ तासात या मोहिमेअंतर्गत तब्बल ३.६ कोटी रुपये जमा झाले आहेत. याबद्दल विराटने ट्विट करत माहिती दिली आहे.
विराटने ट्विट केले आहे की ‘२४ तासांपेक्षाही कमी कालावधीत ३.६ कोटी रुपये! खुप चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहे. आमचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी संघर्ष करत राहू आणि देशाची मदत करा. सर्वांचे धन्यवाद.’
https://twitter.com/imVkohli/status/1390894255879573507
विराट आणि अनुष्काने शुक्रवारी (७ मे) या मोहिमेची घोषणा केली होती. त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यात त्यांनी म्हटले होते की “मी आणि अनुष्काने केट्टोसोबत मिळून एक मोहीम सुरू केली आहे. ज्यामुळे कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी अधिक देणगी जमा करता येईल. त्यामध्ये आपण केलेल्या सहकार्याने आम्हाला आनंद होईल. आपण एकत्र येऊया आणि आपल्या आजूबाजूच्या गरजूंची सेवा करूया आणि त्यांना मदत करूया.”
https://twitter.com/imVkohli/status/1390532345753522180
यापूर्वी अनेक खेळाडूंनी केला मदतीचा हात पुढे
विराटपूर्वीदेखील अनेक क्रिकेटपटू यावेळी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मदतीसाठी पुढे आले आहेत. यात पॅट कमिन्स, ब्रेट ली, निकोलस पूरन, जेसन बेऱ्हेंडॉर्फ अशा परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. तसेच सचिन तेंडुलकर, हार्दिक आणि कृणाल पंड्या, इरफान आणि युसुफ पठाण, गौतम गंभीर, जयदेव उनाडकट, शिखर धवन, लक्ष्मीरतन शुक्ला, आर अश्विन, रिषभ पंत असे काही भारतीय खेळाडूंनीही मदतीचा हात पुढे केला आहे. याशिवाय आयपीएलमधील अनेक संघांनीही मदतीचा हात पुढे केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
टीम इंडियात झाली अर्झन नागवासवालाची एंट्री, तब्बल ४६ वर्षांनंतर घडला ‘हा’ इतिहास
चेन्नईसाठी आनंदाची बातमी! फलंदाजी प्रशिक्षक हसी कोरोना निगेटिव्ह, लवकरच होऊ शकतो ‘या’ देशात रवाना