कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने भारतात हाहाकार माजला आहे. सतत वाढत असलेल्या घटनांमुळे देशामध्ये ऑक्सिजनसाठी तीव्र संघर्षही सुरू आहे. दररोज तीन लाखाहून अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण होत आहे. इंडियन प्रीमियर लीगलाही कोरोना विषाणूचा फटका बसलेला दिसून येतो. रविचंद्रन अश्विनसह पाच खेळाडूंनी या स्पर्धेतून माघार घेतली आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्सचा संघ मुंबईतून दिल्लीला पोहचला तेव्हा एक विचित्र घटना घडली.
बेंगलोरहून दिल्लीला विमानात एक व्यक्ती आपल्या आजारी वडिलांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन घेऊन चालला होता. दुर्दैवाने, विमानातून उतरल्यानंतर त्यांचे मशीन कुठेतरी हरवले. अन्वर नावाच्या या व्यक्तीच्या वडिलांवर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू असून त्याला ऑक्सिजनची आवश्यकता आहे. परंतु, अन्वर जेव्हा लगेज सेक्शनवर आपला सामान उचलण्यासाठी आला तेव्हा तिथे त्याला ही मशीन सापडली नाही. तो चोवीस तास मशीन शोधण्यासाठी प्रयत्न करत राहिला. या काळात अन्वर विमानतळ अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहिला आणि शेवटी सीसीटीव्ही फुटेजमध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची बॅग कोणी नेली हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.
चेन्नईच्या सदस्याकडे सापडले मशीन
एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्सचे खेळाडूही त्याच दिवशी बेंगलोरहून दिल्लीला निघाले होते. संघाच्याच एका सदस्यापैकी एकाने संघाचे साहित्य समजून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची बॅग उचलली. हे घडले कारण ज्या खोलीत संघाचे सामान स्वच्छ केले होते, त्या खोलीत हा ऑक्सिजन केंद्रक देखील ठेवण्यात आला होता. मात्र, नंतर अन्वरला त्याची मशीन ताब्यात देण्यात आली, जो त्याची आतुरतेने वाट पाहत होता.
अव्वलस्थानी काबीज सीएसके
चेन्नई सुपर किंग्सच्या आयपीएल २०२१ मधील कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास धोनीच्या नेतृत्वाखालील हा संघ गुणतालिकेत अव्वलस्थानी आहे. चेन्नईने त्यांच्या ६ सामन्यांपैकी ५ सामने जिंकले असून त्याचे दहा गुण आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
काईल जेमिसनने नेटमध्ये विराटला गोलंदाजी करण्यास दिला नकार, ‘हे’ होते मोठे कारण
कोरोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढे आला शिखर धवन, घेतला ‘हा’ मोठा निर्णय