---Advertisement---

“विराट, मला RCB मध्ये स्थान मिळेल का?” व्हिडिओ शेअर करत स्टार फुटबॉलपटूचा प्रश्न

---Advertisement---

क्रिकेट हा खेळ संपूर्ण जगात लोकप्रिय आहे. इतर खेळ खेळणाऱ्या खेळाडूंनाही क्रिकेटची आवड असते यात शंका नाही. एका उदाहरणावरून तुम्हालाही याची प्रचिती येईल. नुकत्याच एका स्टार फुटबॉलपटूने क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावरून शेअर केला. या व्हिडीओमध्ये त्याचं फलंदाजीचं कौशल्य पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

इंग्लंडचा स्टार फुटबॉलपटू हॅरी केन याने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला. त्यात तो त्याच्या संघ सहकाऱ्यांसोबत क्रिकेट खेळताना दिसतोय. इंग्लंडचा गोलरक्षक जो हार्ट केनला गोलंदाजी करत आहे. इंग्लंडचा दुसरा स्टार फुटबॉलपटू डेल अलीने केनचा झेल सोडला त्यामुळे तो आनंद साजरा करताना दिसत आहे.

या ट्विटमध्ये त्याने दिग्गज फलंदाज आणि रॉयल चालेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीला टॅग केले आहे. त्याने ट्विट करताना लिहिले की “मी टी20 सामन्यात विजय मिळवून देणारा डाव खेळला. पुढच्या आयपीएल हंगामात बेंगलोर संघात स्थान मिळेल का?”

आरसीबीकडूनही त्याला त्याला चांगली दाद मिळाली, आरसीबीने ट्विट केले की “जर्सी क्रमांक 10 चा खेळाडू हे करेल.”

हॅरी केन हा आधुनिक काळात प्रीमियर लीगमधील सर्वोत्कृष्ट स्ट्रायकरपैकी एक मानला जातो. चालू हंगामात, केनने आपला क्लब टोटेनहॅमसाठी प्रीमियर लीगच्या 9 सामन्यांमध्ये 7 गोल केले आहेत. युरोपा लीगमधील क्लबसाठीही त्याने एक गोल केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

…म्हणून ऑस्ट्रेलियन फलंदाज भारतीय गोलंदाजांची धुलाई करत असताना हार्दिकने केली नाही गोलंदाजी

ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का! ‘हा’ खेळाडू दुसऱ्या वनडेला मुकण्याची शक्यता

टीम इंडियाला शतकी तडाखा दिलेला फिंच आरसीबी फॅन्सकडून ट्रोल; मीम्स झाले व्हायरल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---