---Advertisement---

हातात ब्रश घेऊन मैदानावर फिरणारा ‘तो’ व्यक्ती आहे तरी कोण? भारताच्या विजयात उचललाय मोलाचा वाटा

On: बुधवार, नोव्हेंबर 2, 2022 11:08 PM
Raghu
---Advertisement---

बुधवारी (दि. 3 नोव्हेंबर) भारतीय क्रिकेट संघाने टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या 35व्या सामन्यात बांगलादेशला धूळ चारली. या सामन्यात भारताने पावसामुळे डकवर्थ लुईस नियमांमुळे बांगलादेशला 5 धावांनी पराभूत केले. या विजयामुळे रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने टी20 विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात पोहोचण्याच्या आशा अजून मजबूत केल्या आहेत. भारताच्या या विजयात विराट कोहली, केएल राहुल, अर्शदीप सिंग यांनी मोलाचे योगदान दिले. मात्र, या सर्वांमध्ये आणखी एक व्यक्ती होता, ज्याने मोठा वाटा उचलला. कोण आहे तो व्यक्ती, चला जाणून घेऊया…

विराट कोहली (Virat Kohli) आणि केएल राहुल (KL Rahul) यांनी अर्धशतक झळकावत संघासाठी महत्त्वाची खेळी करत मोलाचा वाटा उचलला. मात्र, यांच्याव्यतिरिक्त भारतीय संघाच्या विजयात मोठा वाटा उचलणारा तो व्यक्ती इतर कुणी नसून रघू आहेत. रघू हे भारतीय संघाच्या प्रशिक्षण सदस्यांमध्ये सामील आहेत. तसेच, ते थ्रो डाऊनमार्फत फलंदाजांकडून सराव करवून घेतात. ते आपला अधिकतर वेळ नेट्समध्ये घालवतात, परंतु बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात रघू ऍडलेड ओव्हलच्या मैदानावर दिसले आणि भारतीय संघाच्या खेळाडूंना प्रशिक्षण देत होते.

जेव्हा भारतीय संघ विजयासाठी बांगलादेशविरुद्ध लढताना दिसत होता, तेव्हा रघू मैदानावर खेळाडूंची मदत करत होते. झालं असं की, सामन्याच्या दुसऱ्या डावादरम्यान पावसाने एन्ट्री केली होती. त्यामुळे बांगलादेश संघाला फक्त 16 षटके खेळण्याची संधी मिळाली. मैदान ओले होते आणि भारतीय खेळाडूंच्या बुटांवर माती चिटकली होती. रघू आपल्या ब्रशने भारतीय संघाच्या खेळाडूंच्या बुटांवरील माती काढत होते, जेणेकरून ओल्या मातीमुळे ते घसरणार नाहीत आणि त्यांना दुखापतही होणार नाही.

भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) सामन्यातील रघू यांचा हातात ब्रश घेतलेला फोटो आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यासोबतच त्यांची प्रशंसादेखील केली जात आहे. सध्या सोशल मीडियावर भारताच्या विजयापेक्षा जास्त चर्चा रघू यांचीच रंगलेली दिसत आहे.

भारताचा पुढील सामना
भारतीय संघाचा पुढील सामना रविवारी (दि. 06 नोव्हेंबर) मेलबर्न येथे झिम्बाब्वेविरुद्ध होणार आहे. या सामन्याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटच्या षटकारावर इंग्लंडची महिला खेळाडूही फिदा, जे काही म्हणाली त्याने कोहलीही होईल खुश
बांगलादेशला कमी फरकाने धूळ चारण्यात भारत आहे ‘मास्टर’, 2016मध्येही केलीय खास कामगिरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---