---Advertisement---

कसोटी मालिकेपूर्वी इंग्लंडला मोठा धक्का, ‘हा’ वेगवान गोलंदाज संपूर्ण हंगामातून बाहेर

On: मंगळवार, ऑगस्ट 3, 2021 5:47 PM
---Advertisement---

इंग्लंड क्रिकेट संघ बुधवारपासून (४ जुलै) भारताविरुद्ध नॉटिंघम येथे पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात करेल. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी इंग्लंड हे आपला संघ घोषित केला आहे. उर्वरित मालिकेसाठीचा संघ त्यानंतर जाहीर केला जाईल. मात्र, तत्पूर्वी इंग्लंड संघाला एक मोठा धक्का बसला आहे. पुनरागमनाच्या प्रतीक्षेत असलेला वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर हा संपूर्ण मालिकेला मुकू शकतो.

भारत दौऱ्यावर झाली होती दुखापत
इंग्लंडसाठी तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये प्रमुख वेगवान गोलंदाज असलेला आर्चर सध्या इंग्लंड संघाबाहेर आहे. त्याच्या कोपराच्या दुखापतीने मार्च महिन्यात उचल खाल्ली होती. भारत दौऱ्यावर असताना यामुळे त्याला वनडे मालिकेला मुकावे लागले होते. त्यानंतर तो आयपीएल २०२१ व इंग्लंडच्या सर्व आंतराष्ट्रीय सामन्यांत सहभागी होऊ शकला नाही.

भारताविरुद्धच्या मालिकेची खेळण्याची होती आशा
आर्चर सध्या दुखापतीतून सावरत असल्याची माहिती समोर येत होती. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या द हंड्रेड लीगमध्ये तो सदर्न ब्रेव संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उत्सुक होता. तसेच, आगामी रॉयल लंडन वनडे स्पर्धेत ससेक्स संघासाठी मैदानात उतरला असता. या स्पर्धांमध्ये तंदुरुस्ती पाहून त्याला भारताविरुद्धच्या मालिकेत संधी देण्याविषयी चर्चा सुरू होती. मात्र, नुकत्याच येत असलेल्या बातम्यांनुसार त्याच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया होणार असून तो संपूर्ण हंगामातून बाहेर पडू शकतो. यापूर्वी वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्स टाचेच्या दुखापतीमुळे तर, प्रमुख अष्टपैलू बेन स्टोक्स वैयक्तिक कारणाने मालिकेतून बाहेर गेला आहे.

इंग्लंडसाठी महत्वपूर्ण आहे आर्चर
आर्चर हा इंग्लंड संघासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण खेळाडू मानला जातो. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात युएई येथे खेळविण्यात येणाऱ्या टी२० विश्वचषकात त्याच्याकडून इंग्लंडला बऱ्याच अपेक्षा असणार आहेत. तसेच, विश्वचषकानंतर होणाऱ्या ऍशेस मालिकेत इंग्लंडची रणनिती आर्चरभोवती फिरताना दिसेल. इंग्लंडने जिंकलेल्या २०१९ विश्वचषक विजयात त्याचे मोलाचे योगदान होते.

महत्त्वाच्या बातम्या – 

जागतिक विक्रम करत सुवर्णपदक जिंकलेल्या ‘त्या’ खेळाडूने चक्क सुपरमॅनसारखी फाडली जर्सी, पाहा व्हिडिओ

“भारतात फिरकीला अनुकूल खेळपट्टी होती, मग आम्हाला इंग्लंडमध्ये वेगवान पीच बनवण्याचा हक्क आहे”

कधी, कुठे आणि कसा पाहाल भारत विरुद्ध इंग्लंड पहिला कसोटी सामना? जाणून घ्या सर्वकाही

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---