टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदके आणणाऱ्या खेळाडूंची बऱ्याच काळापासून चर्चा होत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी टोकियोला गेलेल्या सर्व खेळाडूंचा सन्मान केला आणि खेळाडूंची भेट देखील घेतली. सोमवारी, पंतप्रधान मोदींनी नीरज चोप्रासोबत चुरमा खाल्ला तर, पीव्ही सिंधूसोबत आइस्क्रीम खाण्याचे वचनही पाळले. या दरम्यान, पंतप्रधान मोदींनी महिला कुस्तीपटू विनेश फोगाटसोबत देखील चर्चा केली.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदकासाठी प्रबळ दावेदार असलेल्या विनेशला मोठे अपयश आले. तिला पदकाच्या सामन्यापर्यंतही पोहचता आले नाही. त्यानंतर शिस्त न पाळल्याबद्दल दोषी सिद्ध झाल्यानंतर तिच्यावर बंदी घालण्यात आली. जेव्हा मोदींनी विनेशला याबद्दल विचारले तेव्हा ती जास्त बोलू शकली नाही.
विनेश निराश होऊ नकोस
पंतप्रधान म्हणाले की, “विनेश माझ्या स्वतःच्या कुटुंबाची आहे. तुला खूप राग आला बेटा, तुला स्वतःचा एवढा राग का आला? तू खूप छान खेळली आहेस. तुझ्या कुटुंबाने तुला खूप काही दिले आहे. विनेश निराश होऊ शकत नाही. ही गोष्ट चालणार नाही. मी ऐकले की, तू आल्यानंतर कोणाला भेटली नाहीस. हा कोणता मार्ग आहे?”
प्रतिसाद देताना विनेश म्हणाली की, “जेव्हा इतक्या मेहनतीनंतर पदक मिळत नाही, तेव्हा खूप दुःख होते.” तेव्हा पंतप्रधान मोदी म्हणाले, “नाही, असे होत नाही. खेळाडूच्या आयुष्यात पराभव होणे, हा डाव्या हाताचा खेळ आहे. खेळाडू हरला तरी तो चिंता करत नाही.”
विजयाला कधीच डोक्यावर चढून देवू नका
यानंतर विनेश म्हणाली की, “मला पराभव स्वीकारायला थोडा वेळ लागतो.” यावर पंतप्रधान म्हणाले की, “नाही, ते मनातून टाकायचं. मी नुकतेच नीरज चोप्राला सांगितले की, विजय कधीही तुमच्या डोक्यावर चढू देऊ नका आणि पराभव तुमच्या मनात कधीही बसू देऊ नका. हे मंत्र जीवनात खूप महत्वाचे आहेत. ज्याचे मन विजयाने भरले आहे, तो निरुपयोगी होतो. पराभव मनात बसला तरी तीच परिस्थिती होते. विनेश मी तुला निराश होताना पाहू शकत नाही. अन्यथा, असे कर की आठवड्यानंतर, १० दिवसांनी, कुटुंबासोबत एकत्र ये, आपण बोलू. पण निराश होऊ नको.”
पंतप्रधान मोदींचे नंतर विनेशने आभार मानले. विनेश म्हणाली की, “तुम्ही जे सांगितले ते त्या सर्व खेळाडूंना प्रेरणा देईल, ज्यांना पदके मिळाली नाहीत. ही खूप मोठी गोष्ट आहे.”
पंतप्रधानांनी हॉकी संघासोबतदेखील चर्चा केली. ते म्हणाले की, “जर ऑलिम्पिकमध्ये हॉकी जिंकली नाही, तर देश जिंकला असे वाटत नाही.” गोलरक्षक आर श्रीजेशनेही मोदींचे कौतुक केले. तो म्हणाला की, “विजयानंतर तुमचा आलेला कॉल आमच्यासाठी खूप चांगला होता.” मोदींनी खेलरत्न पुरस्काराचे नाव का बदलले याचा खुलासा केला. मोदी म्हणाले, “मला हॉकीमुळे खूप प्रेरणा मिळाली. म्हणूनच मी राजीव गांधी खेलरत्न हे नाव मेजर ध्यानचंद असे ठेवले.”
महत्त्वाच्या बातम्या –
भारताविरुद्ध लढण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा; ‘या’ दोन दिग्गज गोलंदाजांची मालिकांमधून माघार
‘या’ कारणासाठी बीसीसीआय मानतेय चाहत्यांचे आभार
तिसऱ्या कसोटीत देखील भारतीय संघ फडकवणार विजयी पताका? हेडिंग्ले मैदानावर असा आहे भारताचा रेकॉर्ड