---Advertisement---

हेडिंग्लेवर ५४ वर्षांपासून अपराजित राहिलाय भारत, ‘विराट आणि कंपनी’ कायम ठेवू शकेल हा विक्रम?

---Advertisement---

लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर पार पडलेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने १५१ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघासमोर २७२ धावांचे आव्हान दिले होते. परंतु, इंग्लंडचा संपूर्ण डाव १२० धावांवर संपुष्टात आला होता. तत्पूर्वी मालिकेतील पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला होता. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवून १-० ची आघाडी घेतली आहे.

आता इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमधील तिसरा कसोटी सामना २५ ऑगस्टपासून हेडिंग्लेच्या मैदानावर पार पडणार आहे. या मैदानावर भारतीय संघाने गेल्या ५४ वर्षांपासून एकही सामना गमावला नाही. त्यामुळे भारतीय संघाने ही कामगिरी अशीच सुरू ठेवली तर, भारतीय संघ या मालिकेत विजय मिळवण्याची शक्यता आणखी वाढेल.

हेडिंग्लेच्या मैदानावर भारतीय संघाने आतपर्यंत एकूण ६ कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी २ सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवण्यात यश आले आहे. तर ३ सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. यापैकी १ सामना अनिर्णीत राहिला आहे. भारतीय संघाने या मैदानावर खेळलेल्या शेवटच्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे.

तसेच १९६७ नंतर या मैदानावर भारतीय संघाने एकही सामना गमावला नाही. १९८६ मध्ये भारतीय संघाने इंग्लंड संघाला २७९ धावांनी पराभूत केले होते. त्यानंतर सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २००२ मध्ये इंग्लंड संघाला एक डाव आणि ४६ धावांनी पराभूत केले होते. (Team india has not lost any test at headingley since 1967)

सचिन, द्रविड आणि गांगुलीने झळकावले आहे शतक
भारतीय संघाने २२ ते २६ ऑगस्ट २००२ दरम्यान इंग्लंड संघाविरुद्ध कसोटी सामना खेळला होता. या सामन्यात भारतीय संघाने ८ गडी बाद ६२८ धावा केल्या होत्या. यानंतर सौरव गांगुलीने डाव घोषित केला होता. या सामन्यात सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांनी शतक झळकावले होते. सचिनने १९३, द्रविडने १४८ आणि सौरव गांगुलीने १२८ धावांची खेळी केली होती.

कोहली सेना पहिल्यांदाच उतरणार हेडिंग्लेच्या मैदानावर
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि वर्तमान संघातील एकाही खेळाडूने हेडिंग्लेच्या मैदानावर कसोटी सामना खेळला नाही. त्यामुळे हेडिंग्लेच्या मैदानावर पार पडणारा तिसरा कसोटी सामना भारतीय खेळाडूंसाठी एक आव्हान ठरू शकतो. भारतीय संघाने लॉर्ड्सच्या मैदानावर पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात १५१ धावांनी विजय मिळवला होता. यासह तो इंग्लंडमध्ये सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारा भारतीय कर्णधार ठरला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

टी२० विश्वचषकातील सर्वात मोठा विक्रम विराटच्या दृष्टीक्षेपात!

विराट अँड कंपनीकडे तब्बल ३५ वर्षानंतर ‘असा’ पराक्रम करून इतिहास रचण्याची सुवर्णसंधी

हम पागल नहीं है भैया, हमारा दिमाग खराब है!! सूर्या अन् पृथ्वीची कॉमेडी पाहून तुम्हीही खदखदून हसाल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---