---Advertisement---

अंतिम सामना गमावल्यानंतर रडू लागला नेमार, मैदानातील वैर विसरुन मेस्सीने दिली गळाभेट

On: रविवार, जुलै 11, 2021 1:42 PM
---Advertisement---

रविवार रोजी (११ जुलै) कोपा अमेरिका २०२१ चा अंतिम सामना अर्जेंटिना विरुद्ध ब्राजील यांच्यात पार पडला. ही रोमांचक आणि अटीतटीची लढत ब्राजीलच्या रिओ डि जिनेरियो शहरातील मारकाना स्टेडियममध्ये झाली. दिग्गज फुटबॉलपटू लिओनल मेस्सीच्या अर्जेंटिना संघाने १-० ने ब्राजीलला पराभवाची धूळ चारत इतिहास रचला.

या ऐतिहासिक विजयानंतर अर्जेंटिनाच्या ताफ्यात आनंदाची लहर पसरली. मात्र उपविजेता ब्राजील संघाचा स्टार क्रिकेटपटू नेमार खूप उदास झाला. परंतु मेस्सीने मैदानातील वैर विसरुन असे काही कृत्य केले, ज्याची सर्वांनीच प्रशंसा केली आहे.

या ऐतिहासिक विजयानंतर मेस्सीला त्याच्या साथीदारांनी खांद्यावर उचलले होते. संपूर्ण स्पर्धेत चार गोल नोंदवून संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्यात मेस्सीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. या ऐतिहासिक विजयानंतर मेस्सीच्या आनंदाचा कोठेच ठावठिकाणा नव्हता. या विजयानंतर संघातील सर्व खेळाडूंनी मैदानावरच आनंद साजरा केला. तर दुसरीकडे, मेस्सीचा बार्सिलोनाचा आपला माजी साथीदार आणि कोपा अमेरिका अंतिम सामन्यातील विरोधक नेमारचा चेहरा पराभवामुळे हिरमुसला होता.

मात्र मेस्सीने आपल्यातील मैत्री न विसरता रडत असलेल्या नेमारची गळाभेट घेतली. तो त्याच्यावर पाठीवर हात फिरवत त्याला शांत करताना दिसला. या भेटीला अंतिम सामन्यातील सर्वोत्कृष्ट क्षण असल्याचे सर्वांनी म्हटले आहे. मेस्सीच्या या वर्तनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. त्याच बरोबर लोक दिग्गज फुटबॉलपटू मेस्सीचे कौतुकही करीत आहेत.

अंतिम सामन्यात एंजेल डि मारियाने 22 व्या मिनिटाला ब्राझीलविरूद्ध गोल करुन अर्जेंटिनाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली आणि ही आघाडी सामन्याच्या शेवटपर्यंत कायम राखली. यासह अर्जेंटिनाने 28 वर्षांची विजेतेपदाची प्रतीक्षा संपवली आणि कोपा अमेरिका विजेतेपद पटकावले.

महत्त्वाच्या बातम्या-

कोपा अमेरिका: अंतिम सामन्यात अर्जेंटिनाचा ब्राजीलवर १-०ने विजय, २८ वर्षांच्या प्रतिक्षेवर अंकुश

डेन्मार्कच्या गोलकीपरच्या डोळ्यावर इंग्लिश प्रेक्षकांनी मारले लेझर, दिग्गजांच्या आल्या संतप्त प्रतिक्रिया

जिद्द असावी तर अशी! पायातून रक्त वाहत असतानाही मेस्सीने संघाला मिळवून दिले अंतिम फेरीचे तिकीट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---