सध्या सय्यद मुश्ताक अली ट्राॅफी (Syed Mushtaq Ali Trophy) खेळली जात आहे. आज, बुधवार (11 डिसेंबर), रोजी स्पर्धेचे उपांत्यपूर्व सामने खेळले गेले. दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीतही दिल्ली आणि यूपीचे संघ आमने-सामने होते. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार आयुष बदोनी (Ayush Badoni) आणि यूपीचा फलंदाज नितीश राणा (Nitish Rana) यांच्यात वादावाद झाला.
नितीश राणा (Nitish Rana) आणि आयुष बदोनी (Ayush Badoni) यांच्यातील वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नितीश राणाचा मैदानावर खेळाडूसोबत वाद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2023च्या आयपीएल दरम्यान नितीश आणि हृतिक शौकीन यांच्यात देखील वाद झाला होता.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या (Syed Mushtaq Ali Trophy) उपांत्यपूर्व फेरीत नितीश आणि आयुष यांच्यातील वादाच्या व्हिडिओमध्ये, नितीश दिल्लीच्या आयुषकडे चेंडू टाकतो, ज्यावर तो एकेरी धाव घेण्यासाठी धावत असल्याचे दिसून येते. आयुष नॉन-स्ट्रायकरच्या शेवटी येताच त्याच्यात आणि नितीशमध्ये वाद सुरू होतो. हळूहळू दोघेही जवळ येऊ लागतात, त्यामुळे अंपायरला मध्ये यावे लागते.
— Sunil Gavaskar (@gavaskar_theman) December 11, 2024
महत्त्वाच्या बातम्या-
या आशियाई देशात प्रथमच होणार फिफा विश्वचषकाचं आयोजन, भारताकडेही क्वालिफाय होण्याची संधी!
भारतीय संघ कसा पोहोचणार, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये?
IND vs AUS; गाबा कसोटी खेळणार नाही जसप्रीत बुमराह? ऑस्ट्रेलिया खेळाडूचा मोठा दावा