भारताचा दिग्गज माजी फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जून तेंडुलकरला टी20 मुंबई लीग स्पर्धेच्या लिलावात आकाश टायगर्स मुंबई वेस्टर्न सबर्बने 5 लाख रुपयांना खरेदी केले आहे. या स्पर्धेचा हा दुसरा मोसम आहे.
डावकरी वेगवान गोलंदाज आणि फलंदाज असणाऱ्या अर्जूनचा या लिलावात अष्टपैलू गटात समावेश होता. तसेच 1 लाख ही त्याची मुळ किंमत होती. त्याच्यावर या लिलावात सर्वांचेच लक्ष होते.
अर्जूनवर अनेक संघांनी बोली लावली पण 5 लाखांची सर्वोच्च बोली ही नॉर्थ मुंबई पँथर्सने लावली. पण लिलाव घेणाऱ्या चारु शर्मा यांनी आकाश टायगर्स मुंबई वेस्टर्न सबर्ब आणि ईगल ठाणे स्ट्रायकर्स या दोन नवीन संघांना ओटीएम(ऑपोरच्यूनिटी टू मॅच) कार्ड वापरण्याची संधी दिली. या संधीचा दोन्ही संघांनी फायदा घेत हे कार्ड वापरले.
त्यामुळे या दोन्ही संघाचे कार्ड एका बॅगमध्ये ठेवण्यात आले आणि नंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य उन्मेश खानविलकर यांनी या बॅगमधील एका कार्डची निवड केली. हे कार्ड आकाश टायगर्स मुंबई वेस्टर्न सबर्ब संघाचे होते. त्यामुळे त्यांच्या संघात अर्जून सामील झाला.
या लिलावाआधी सूर्यकुमार यादव, आकाश पारकर (ट्रीम्फ नाइट्स मुंबई नॉर्थ ईस्ट), शिवम दूबे, सिद्धेश लाड (शिवाजी पार्क लायन्स), पृथ्वी शॉ (नॉर्थ मुंबई पँथर्स), जय बिस्त आणि धुर्मिल माटकर (सोबो सुपरसोनिक्स), शुभम रांजने, तुषार देशपांडे (आर्क-अंधेरी) ), श्रेयस अय्यर, एकनाथ केरकर (नमो बांद्रा ब्लास्टर्स) या खेळाडूंना कायम करण्यात आले आहे.
तसेच आदित्य तरे, सर्फराज खान यांना ईगल ठाणे स्ट्रायकर्सने आणि धवल कुलकर्णी, शाम्स मुलानी यांना आकाश टायगर्स मुंबई वेस्टर्न सबर्ब या दोन नवीन संघांनी निवडले आहे. त्याचबरोबर या लिलावात सुजीत नाईकलाही 5 लाख रुपयांची बोली लागली आहे.
या 8 संघांचा समावेश असणाऱ्या लीगला 14 मेपासून वानखेडे स्टेडीयमवर सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा सचिन तेंडुलकर हा ब्रँडअँबेसेडर आहे.
https://twitter.com/T20Mumbai/status/1124615116161372160
महत्त्वाच्या बातम्या –
–१९ वर्षीय शुबमन गिलने शानदार अर्धशतकासह आयपीएलमध्ये केला मोठा पराक्रम
–अजिंक्य रहाणे पुन्हा करणार राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व…
–न्यूझीलंड ओपन: एचएस प्रणॉयचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव, भारताचेही आव्हान संपुष्टात





