क्रिकेट इतिहासातील सर्वकालीन महान क्रिकेटपटू म्हणून भारताच्या सचिन तेंडुलकर याचे नाव घेतले जाते. फलंदाजीतील अनेक विश्वविक्रम सचिनच्या नावे अजूनही कायम आहेत. त्याचवेळी आता त्याच्या पावलावर पाऊल ठेवत त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर हा देखील क्रिकेटच्या मुख्य प्रवाहात सामील झाला आहे. अर्जुनने मंगळवारी (13 डिसेंबर) सुरू झालेल्या रणजी ट्रॉफी 2022-2023 हंगामात गोवा संघासाठी पदार्पण केले.
गोवा येथील पोरवोरीम येथे सुरू झालेल्या एलिट क गटातील गोवा विरुद्ध राजस्थान या सामन्यात अर्जुनला गोवा संघाकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली. अर्जुनने यावर्षीच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीआधी मुंबई क्रिकेट संघाची साथ सोडली होती. मुंबई क्रिकेट असोसिएशनने त्याच्यासह सिद्धेश लाड व एकनाथ केरकर यांना ना हरकत प्रमाणपत्र देत गोवा संघात सामील होण्याची परवानगी दिलेली.
अर्जुनने याआधी मुंबई संघासाठी दोन टी20 सामने खेळले होते. मात्र त्याला लिस्ट ए व प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली नव्हती. याच कारणाने त्याने मुंबई संघाची साथ सोडण्याचा निर्णय घेतलेला. त्याने गोवा संघासाठी खेळताना सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये 10 तर विजय हजारे ट्रॉफीमध्ये 8 बळी मिळवलेले.
आपल्या पहिल्या रणजी सामन्यात पहिल्या दिवशी तो 4 धावा काढून नाबाद आहे. अर्जुन हा उपयुक्त अष्टपैलू म्हणून ओळखला जातो. डावखुऱ्या हाताने वेगवान गोलंदाजी करणारा अर्जुन सातत्याने 140 पेक्षा जास्तच्या वेगाने मारा करण्यात सक्षम आहे. तसेच, खालच्या क्रमांकावर तो आक्रमक फटकेबाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये तो मागील दोन वर्षांपासून मुंबई इंडियन्सचा भाग आहे. मात्र, त्याला अजूनही आयपीएल पदार्पणाची संधी मिळालेली नाही.
(Arjun Tendulkar Makes Ranji Debute For Goa In Ranji Trophy 2022-2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पोराचा नाद पूर्ण करण्यासाठी अंबानी घेणार अब्जावधींचा फुटबॉल क्लब विकत? इंग्लंडमध्ये बसवणार बस्तान
बांगलादेशचा कर्णधारही पहिल्या कसोटीला मुकणार? सामन्याच्या 24 तास आधी हॉस्पिटलमध्ये दाखल