---Advertisement---

म्हणून अर्जुन तेंडुलकरला पाहुन झाली सचिनच्या वनडे पदार्पणाची आठवण

On: गुरूवार, जुलै 19, 2018 2:23 PM
---Advertisement---

कोलंबो। नॉडेस्क्रीप्ट क्रिकेट क्लबच्या मैदानावर 19 वर्षांखालील भारतीय संघाचा 19 वर्षांखालील श्रीलंका संघाविरुद्ध चार दिवसीय सामना मंगळवारी 17 जुलैलै सुरु झाला आहे.

हा सामना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनचा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना आहे. या सामन्यात त्याने गोलंदाजी करताना चांगली चमक दाखवली होती. मात्र या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी गुरुवारी (19 जुलै) फलंदाजी करताना तो एकही धाव घेण्यात अपयशी ठरला.

अ्ष्टपैलू अर्जुन भारताच्या पहिल्या डावात नवव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास आला होता. पण 11 चेंडू खेळल्यानंतरही त्याला एकही धाव घेता आली नाही. त्याला शशिका दुल्शनने शुन्य धावेवर बाद केले.

योगायोग म्हणजे सचिनही त्याच्या पहिल्या वनडे सामन्यात पाकिस्तानविरुद्ध 1989 मध्ये शुन्यधावेवर बाद झाला होता. त्यामुळे अर्जुन शुन्याबर बाद झाल्याने सर्वांना सचिन तेंडुलकरच्या वनडेतील पदार्पणाच्या सामन्याची आठवण झाली.

अर्जुनला या सामन्यात फलंदाजीत जरी अपयश आले असले तरी त्याने सामन्याच्या पहिल्या दिवशी चांगली गोलंदाजी करताना 11 षटकात 33 धावा देत 1 विकेटही मिळवली होती. तसेच त्याने 2 षटके निर्धाव टाकली होती.

या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद 244 धावा केल्या आहेत. तर भारताने पहिल्या डावात सर्वबाद 589 धावा केल्या. भारताकडून अथर्व तायडे आणि आयुष बडोणी यांनी अनुक्रमे 113 आणि 185 धावा करत शतके साजरे केले. तसेच कर्णधार अनुज रावतनेही 63 धावा करत अर्धशतक केले.

अर्जुनची पहिल्यांदाच 19 वर्षाखालील भारतीय संघात श्रीलंका दौऱ्यातील चारदिवसीय सामन्यांसाठी निवड झाली आहे. या दौऱ्यात भारतीय संघ 2 चारदिवसीय सामने खेळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

एमएस धोनीच्या निवृत्तीच्या चर्चेला अखेर पूर्णविराम, रवी शास्त्रींनी केला मोठा खुलासा

अॅडम गिलक्रिस्ट म्हणतो हा फिरकीपटू मला घाम फोडायचा

भुवनेश्वर कुमारचा तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातील समावेश पडला महागात, विराट कोहली आणि रवी शास्त्री अडचणीत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment