इंडियन प्रीमियर लीग २०२२चा हंगाम संपायला आला आहे. या हंगामातील साखळी फेरीचे केवळ २ सामने बाकी आहेत. यातील एक सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात शनिवारी रोजी (२१ मे) होणार आहे. हा सामना अतिशय निर्णायक सामना असणार आहे. या सामन्याच्या निकालाद्वारे प्लेऑफमध्ये जागा मिळवणारा चौथा संघ निश्चित होईल. या सामन्यात युवा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडूलकर याला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू अजय जडेजा यालाही असेच वाटते.
दिल्लीविरुद्धच्या (MI vs DC) सामन्यातून सचिन तेंडूलकरचा (Sachin Tendulkar Son) मुलगा अर्जुन (Arjun Tendulkar) आपले आयपीएल पदार्पण करेल, असे विधान जडेजाने (Ajay Jadeja) केले आहे.
मुंबईचा संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे. दिल्लीविरुद्धचा सामना हा त्यांच्यासाठी केवळ औपचारिकता असेल. अशात मुंबई संघाचा कर्णधार रोहित शर्मा या सामन्यात अशा काही खेळाडूंना संधी देऊन पाहू शकतो, ज्यांनी चालू हंगामात एकही सामना खेळलेला नाहीय.
क्रिकबजवर बोलताना जडेजा म्हणाला की, “मुंबई इंडियन्सजवळ एक अनोखा विक्रम करण्याची संधी असेल. संघाच्या अंतिम एकादशमध्ये सर्व खेळाडूंना खेळवण्याचा हा विक्रम असेल. कारण मुंबईने या हंगामात त्यांच्या ताफ्यातील सर्व खेळाडूंना आजमावून पाहिले आहे. आता अर्जुन तेंडूलकरला खेळवायचे बाकी आहे. त्यामुळे मला वाटते की, अर्जुन तेंडूलकर दिल्लीविरुद्ध नक्कीच खेळेल. याद्वारे त्यांना कमीत कमी कळेल तरी की, अर्जुन कसे प्रदर्शन करतो. मला अपेक्षा आहे की, ज्या ३ युवा खेळाडूंना आतापर्यंत एकही सामना खेळायची संधी मिळालेली नाही, मुंबई त्यांना नक्कीच प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी करेल.”
मुंबईने २२ वर्षीय अर्जुनला मेगा लिलावात ३० लाख रुपयांना विकत घेतले होते. तो आयपीएल २०२१ मध्येही मुंबई संघाचा भाग होता, परंतु दुखापतीमुळे तो आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातून बाहेर झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
Video: २२ वर्षांच्या गोलंदाजावरही अश्विनला नाही आली दया, गुडघ्यावर बसून मारला ९७ मीटरचा सिक्स
माहीची क्रेझ! चालू सामन्यादरम्यान चाहत्याची धोनीकडे धाव, मग अंपायरने केले असे काही
‘वाह भाई घर हो तो ऐसा!’ गांगुलीपूर्वी ‘या’ ४ भारतीय क्रिकेटर्सनी खरेदी केलीत आलिशान घरं