---Advertisement---

रुसवा, फुगवा की संधी न मिळण्यामागची निराशा? वडील सचिनच्या शेजारी तोंड पाडून बसलेला दिसला अर्जुन

On: शनिवार, एप्रिल 16, 2022 6:31 PM
Sachin-Arjun-Tendulkar
---Advertisement---

आयपीएल २०२२ च्या २६ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स संघ आमने सामने होते. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यातून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याचा मुलगा अर्जुन तेंडूलकर याला आयपीएल पदार्पण करण्याची संधी मिळेल, अशी चाहत्यांना अपेक्षा होती. मुंबई संघाने सामन्यापूर्वी तसे संकेतही दिले होते. परंतु तसे झाले नाही. मात्र मैदानावर न उतरताही अर्जुन चर्चेचा भाग बनला. तो सामन्यादरम्यान वडिल सचिनसोबत डगआऊटमध्ये दिसला आहे. 

सचिन (Sachin Tendulkar) आयपीएल २०२२साठी मुंबई संघाचा मार्गदर्शक आहे. त्यामुळे तो नेट्समध्ये खेळाडूंना मार्गदर्शन करताना बऱ्याचदा दिसला आहे. परंतु फार क्वचितच त्याला त्याचा मुलगा आणि वेगवान गोलंदाज अर्जुनसोबत (Arjun Tendulkar) पाहिले गेले आहे. अशात लखनऊविरुद्ध (MI vs LSG) डगआऊटमध्ये हे बाप-लेक एकत्र दिसल्याने चाहत्यांचे त्यांच्याकडे (Sachin & Arjun Together In Dugout) लक्ष वेधले गेले आहे.

सोशल मीडियावर सचिन आणि अर्जुनचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ते दोघेही मुंबईच्या डगआऊटमध्ये एकत्र बसून सामना पाहताना दिसत आहे. यादरम्यान सचिन त्याला काहीतरी सांगत आहे, जे अर्जुन शांतपणे ऐकताना दिसत आहे. तसेच सचिनची पत्नी अंजली आणि मुलगी सारा तेंडूलकरदेखील मुंबईला चीयर करण्यासाठी आल्या आहेत.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

मुंबई फ्रँचायझीने दिले होते संकेत
लखनऊविरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबई संघाने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये त्यांनी अर्जुनचा फोटो जोडत लिहिले होते की, मुंबई विरुद्ध लखनऊ सामन्यासाठी आमच्या डोक्यात असलेली व्यक्ती. या पोस्टनंतर अनेकांना वाटले होते की, अर्जुनला लखनऊविरुद्ध खेळवले जाईल. परंतु त्याला पुन्हा एकदा प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही.

https://www.instagram.com/p/CcXeOe2MkkM/?utm_source=ig_web_copy_link

मुंबईने २२ वर्षीय अर्जुनला मेगा लिलावात ३० लाख रुपयांना विकत घेतले होते. तो आयपीएल २०२१ मध्येही मुंबई संघाचा भाग होता, परंतु दुखापतीमुळे तो आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातून बाहेर झाला होता.

मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स सामन्यासाठी असे आहेत ११ जणांचे संघ – 

मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, फॅबियन ऍलन, जयदेव उनाडकट, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स.

लखनऊ सुपर जायंट्स – केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), मनीष पांडे, दीपक हुडा, मार्कस स्टॉयनिस, आयुष बदोनी, जेसन होल्डर, कृणाल पंड्या, दुश्मंथा चमीरा, आवेश खान, रवी बिश्नोई

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

‘तो लहानपणीचा हिरो, त्याच्या ऍक्शनची कॉपी करण्याचाही केलेला प्रयत्न’, विराटच्या वॉर्नबद्दल भावना व्यक्त

ब्रेकिंग! मुंबई इंडियन्सविरुद्ध केएल राहुलची नाद खुळा इनिंग, १००व्या सामन्यात झळकावले ‘शतक’

Video: पॅट कमिन्सच्या वेगवान चेंडूने अभिषेक शर्माच्या उडवल्या दांड्या, पुल शॉट मारण्याचा केलेला प्रयत्न

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---