‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर याचा रविवारी (२४ एप्रिल) ४९ वा वाढदिवस साजरा करत आहे. पण, सध्या तो इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामासाठी मुंबई इंडियन्सबरोबर मार्गदर्शक म्हणून जोडला गेलेला असल्याने संघाबरोबरच आहे. सचिन हा जगभरातील सर्वात लोकप्रिय खेळाडूंपैकी एक असल्याने त्याच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्याचा मुलगा अर्जून याने देखील त्याला खास शुभेच्छा दिल्या आहेत.
मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये संघातील युवा खेळाडू सचिनबद्दलच्या (Sachin Tendulkar) आठवणी सांगितल्या आहेत आणि त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Sachin Tendulkar Birthday) दिल्या आहेत. यामध्ये हृतीक शौकिन, आर्यन जुयाल, तिलक वर्मा, डेवाल्ड ब्रेविस, राहुल बुद्धी अशा मुंबई इंडियन्समधील युवा खेळाडूंनी सचिनला शुभेच्छा दिल्या आहेत.
तसेच या व्हिडिओच्या अखेरीस सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जून तेंडुलकरने (Arjun Tendulkar) म्हणले आहे की, ‘माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्या आयुष्यात तुम्ही माझ्यासाठी जे काही केले आहे, त्याबद्दल आभार. तुमच्या दिवसाचा आनंद घ्या.’
या व्हिडिओला कॅप्शन देताना मुंबई इंडियन्सने लिहिले की, ‘त्याने सर्वांना क्रिकेट पाहाण्यासाठी प्रेरणा दिली. खेळाडूंनी सचिनला पहिल्यांदा भेटण्याच्या आठवणी शेअर केल्या आहेत आणि त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.’
https://twitter.com/mipaltan/status/1518081743005249537
अर्जुन हा देखील गेले २ वर्षे आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा भाग आहे. पण, त्याला अद्याप आयपीएल पदार्पणाची संधी देण्यात आलेली नाही. मात्र, तो आयपीएल दरम्यान अनेकदा सचिन तेंडुलकरबरोबर वेळ घालवताना दिसला आहे.
सचिनला वाढदिवसाची मुंबई इंडियन्सकडून मिळणार भेट?
खरंतर मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल २०२२ हंगाम फारसा चांगला ठरलेला नाही. त्यांनी आत्तापर्यंत खेळलेल्या सर्व ७ सामन्यांत पराभव स्विकारला आहे. त्यामुळे त्यांना आता आठव्या सामन्यात विजयाची अपेक्षा आहे. त्यांचा आठवा सामना सचिनच्या वाढदिवशीच म्हणजे रविवारी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यात जर मुंबई जिंकली, तर मार्गदर्शक सचिनसाठी ही एक चांगली वाढदिवसाची भेट ठरू शकते.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषकात मॅथ्यू वेडचा कॅच सोडल्यानंतर मला कित्येक रात्र वाईट स्वप्न पडत होती- हसन अली
वाढदिवस विशेष: सचिन- क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…
ससेक्सची पुन्हा घसरगुंडी, पण चेतेश्वर पुजाराने लय ठेवली कायम; द्विशतकानंतर आता ठोकली सेंच्यूरी





