Friday, March 31, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सर्वोत्तम कामगिरीसह अर्जुन, सुखमीत उपांत्य फेरीत, हवालदार नारायण पॅरा सिंगल स्कल्सच्या अंतिम फेरीत

सर्वोत्तम कामगिरीसह अर्जुन, सुखमीत उपांत्य फेरीत, हवालदार नारायण पॅरा सिंगल स्कल्सच्या अंतिम फेरीत

February 23, 2023
in अन्य खेळ, टॉप बातम्या

पुणे – ऑलिम्पियन अर्जुन लाल जाटसह आंतरराष्ट्रीय पदकविजेते सुखमीत आणि हवालदार नारायण यांनी बुधवारी वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय नौकानयन (रोईंग) स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. लष्कराच्या सीएमई येथील आंतरराष्ट्रीय ट्रॅकवर ही स्पर्धा सुरु आहे.

स्पर्धेच्या पहिल्या दिवशी
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील सहभागी अर्जुनने अजय त्यागीसह ७ मिनिटे ३.२९ सेकंग अशी वेळ देताना लाईटवेट डबल्स स्कल्स प्रकारात सर्वोत्तम वेळेसह अव्वल स्थान पटकावले. अर्जुनपाठोपाठ २०१८ आशियाई क्रीडा स्पर्धेत क्वाड सुवर्णपदक विजेत्या सुखमीतने दोन शर्यतीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. डबल स्कल्स प्रकारात सुखमीतने झक्कर खानच्या साथीत ७ मिनिट १.३० सेकंद अशी वेळ दिली. त्यानंतर चौघांच्या स्कल्स प्रकारात सुखमीत, झक्कर, अरविंदर, सलमान जोडीने ६ मिनिट ३४.७७ सेकंद अशी वेळ देत उपांत्य फेरी गाठली.

खुल्या डबल स्कल्स प्रकारात सेनादलाच्या परमिंदर आणि शगनदीप या प्रमुख जोडीने ७ मिनिट ७.५५ सेकंद अशी वेळ दिली. दरम्यान, पोलंडमध्ये २०२२च्या जागितक नौकानयन स्पर्धेत कांस्यदक विजेत्या नारायणने पॅरा सिंगल स्कल्स प्रकाराच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. त्याने ८ मिनिट ३०.२१ सेकंद अशी वेळ दिली. पहिल्या दिवशी २० मिहला आणि ३४ पुरुष विभागातील शर्यती झाल्या. त्यापूर्वी स्पर्धेचे उदघाटन सीएमईचे प्रमुख मेजर जनरल विनायक सैनी यांच्या हस्ते करण्यात आले.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शोएब अख्तर 2002 सालीच बनला असता पाकिस्तानचा कर्णधार, पण कशात अडलं ते घ्या जाणून
आयपीएल 2023पूर्वी बेन स्टोक्सकडून सीएसकेला धक्का! अर्ध्यातून सोडणार धोनी ब्रिगेडची साथ


Next Post
File Photo

एएनपी रन पुणे रन अर्धमॅरेथॉन 19 मार्च रोजी पुण्यात रंगणार

Australia-ODI-Team

भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा, मॅक्सवेलसह स्टार खेळाडूंचे पुनरागमन

Team-India

आता चुकायचं नाही! सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला नडणार का टीम इंडिया? जाणून घ्या संभावित प्लेइंग XI

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143