पुणे – आर्मी बॉईज स्पोर्टस कंपनी संघाने उत्तारार्धातील कमालीच्या वेगवान खेळाने ध्यानचंद अकादमीचे आव्हान ४-३ असे परतवून लावत एसएनबीपी समूहाच्या १६ वर्षांखालील मुलांच्या अखिल भारतीय हॉकी स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. स्पर्धा म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात पार पडली.
कल्लू अलीने दोन गोल करून आर्मी बॉईजवर दडपण आणले होते. . सामन्याला वेगवान सरुवात करून देताना सहा मिनिटातच १-१ अशी बरोबरी झाली होती. पण, कुल्लूच्या दुसऱ्या गोल नंतर नितेशने पूर्वार्धात एक आणि उत्तरार्धात आणखी दोन गोल करून आर्मी बॉईजची ताकद दाखवून दिली. त्यामुळे मध्यंतराला २-३ अशी आघाडी मिळविल्यानंतरही उत्तरार्धातील खेळाने आर्मी बॉईजला विजेतेपद मिळविणे शक्य झाले.
राऊंड ग्लास अकादमीने यजमान एसएनबीपी अकादमीवर ५-१ असा सहज विजय मिळवून तिसरे स्थान पटकावले. नंतर डॉ. डी. के. भोसले (संस्थापक अध्यक्ष आणि संचालक एसएनबीपी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट), डॉ. वृषाली भोसले (अध्यक्ष संचालक एसएनबीपी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट) यांच्या हस्ते ऑलिंपियन श्री. यांच्या उपस्थितीत पारितोषिके प्रदान करण्यात आली. राजिंदर सिंग सीनियर, इंडिया इंटरनॅशनल अजितेश रॉय. देवयानी भोसले, संचालिका एसएनबीपी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि अॅड. रुतुजा भोसले, संचालक एसएनबीपी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट. (Army Boys Sports Company won the title, Nitesh Kumar scored three goals for the winners)
निकाल
आर्मी बॉईज स्पोर्ट्स कंपनी: 4 (समीर 6वा; नितेश शर्मा 13वा – p.c; 44वा – p.c, 59वा – p.c) वि.वि. ध्यानचंद अकादमी: 3 (कल्लू अली 6वा, 12वा – p.c; अभिषेक कुजूर 25वा – p.c). HT: 2-3
राउंड ग्लास अकादमी: 5 (दीपकप्रीत सिंग 6वा – p.c, 54वा; अमनदीप सिंग 15वा, p.c; जसमीत सिंग ५०वा, ५१वा) वि.वि. एसएनबीपी अकादमी : १ (शुभम राजभर ३१वा)
वैयक्तिक पुरस्कार
सर्वोत्कृष्ट गोलरक्षक : विकास पटेल (ध्यानचंद अकादमी)
सर्वोत्कृष्ट बचावपटू: अमनदीप सिंग (राऊंड ग्लास अकादमी)
बेस्ट हाफ: आशिष कुमार (ध्यानचंद अकादमी
सर्वोत्कृष्ट फॉरवर्ड: संचित होरो (आर्मी बॉईज स्पोर्ट्स कंपनी)
स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू: मनजीत सिंग (ध्यानचंद अकादमी)