मंगळवारी (२८ जून) भारतीय संघाने आयर्लंडविरुद्धचा दुसरा टी-२० सामना खेळला. भारतीय खेळाडूंनी या सामन्यात उत्कृष्ट प्रदर्शन केले. आयर्लंडविरुद्धच्या या दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेत वेगवान गोलंदाज उमरान मलिकला आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळाली. पण संघात असे दोन खेळाडू राहिले, ज्यांना पदार्पणाची संधी मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु संघ व्यवस्थापनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.
उमरान मलिकला आयर्लंडविरुद्धच्या या टी-२० मालिकेत पदार्पणाची संधी मिळाली. पण अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) आणि राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) यांना मात्र पदार्पणासाठी अजून वाट पाहावी लागणार आहे. आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी जेव्हा भारताचा संघ घोषित केला गेला; तेव्हा उमरान, अर्शदीप आणि राहुल त्रिपाठी या तीन अनकॅप्ड खेळाडूंना संघात स्थान दिले गेले होते. परंतु प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रत्यक्षात फक्त उमरान जागा बनवू शकला.
अर्शदीप सिंगने आयपीएल २०२२ मध्ये केलेल्या प्रदर्शनने अनेकांना प्रभावित केले होते. त्याने हंगामात जास्त विकेट्स घेतल्या नाहीत, पण शेवटच्या षटकांमध्ये तो संघासाठी किफायशीर ठरला. याच पार्श्वभूमीवर त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत पहिल्यांदाच भारतीय संघात निवडले गेले होते. परंतु आफ्रिकी संघाविरुद्धच्या मालिकेत त्याला संधी मिळाली नव्हती. अशात आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत अर्शदीप पदार्पण करेल, असे अनेकांना वाटत होते. पण या मालिकेत देखील हे शक्य होऊ शकले नाही.
राहुल त्रिपाठीने देखील यावर्षीचा आयपीएल हंगाम गाजवला. राहुल हंगामात सर्वाधिक धावा करणारा अनकॅप्ड खेळाडू ठरला होता. त्याने १४ सामन्यांमध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी ४१३ धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत त्याल निवडले न गेल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. अशात आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याला संघात सामील केले गेले, पण पदार्पण मात्र करू शकला नाही. अशी माहिती समोर येत आहे की, इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी आयर्लंडविरुद्ध उतरवलेला भारतीय संघ जसाच्या तसा निवडला जाऊ शकतो. असे झाले, तर इंग्लंडविरुद्ध या दोघांना पदार्पण करण्यासाठी अजून एक संधी असेल.
उमरान मलिकचा विचार केला, तर आयपीएल २०२२ मध्ये २२ विकेट्स घेतल्या. पण त्याच्या गोलंदाजीचे आकर्षण ठरले त्याची गती. त्याने हंगामात १५० किमीच्या ताशी गतीने निरंतर गोलंदाजी केली. एका सामन्यात उमरानने १५७ किमीच्या ताशी गतीने चेंडू टाकला, जो हंगामातील दुसरा वेगवान चेंडू ठरला. या जबरदस्त प्रदर्शनाच्या जोरावर उमरानने आयर्लंडविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा पक्की केली. मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही त्याला खेळण्याची संधी मिळाली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
दीपक हुड्डाच्या तुफानी फलंदाजीमागचे रहस्य आले पुढे, अजून कोणी नव्हे ‘या’ खेळाडूने दिलेलं गुरू ज्ञान!
दीपक हुड्डाच्या तुफानी फलंदाजीमागचे रहस्य आले पुढे, अजून कोणी नव्हे ‘या’ खेळाडूने दिलेलं गुरू ज्ञान!