भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टी20 सामना ऐतिहासिक ठरला. या सामन्यात भारताचे पहिले फलंदाज तिलक वर्मा आणि अभिषेक शर्मा यांनी शानदार फलंदाजी करत 219 धावांची मोठी धावसंख्या उभारली. यानंतर भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेला 208/7 धावांपर्यंत रोखले. भारताकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक 3 बळी घेतले. या शिवाय वरुण चक्रवर्तीने 2 बळी घेतले तर हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल यांना 1-1 यश मिळाले.
भारताच्या 219 धावांच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. मात्र अखेरच्या षटकात केलेल्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे अर्शदीपने भारताला विजय मिळवून दिला. या सामन्यात अर्शदीपने इतिहास रचला आहे. खरं तर, अर्शदीपने 4 षटकात 37 धावा देत 3 बळी घेत सर्व भारतीय वेगवान गोलंदाजांना मागे टाकले आणि नंबर-1चा मुकुट मिळवला.
एक वेगवान गोलंदाज म्हणून, अर्शदीप सिंगने जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार सारख्या दिग्गजांना मागे टाकत भारतासाठी टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेऊन एक महान कामगिरी केली आहे. अर्शदीपच्या नावावर आता टी20 क्रिकेटमध्ये 92 विकेट्स आहेत. या सामन्यापूर्वी अर्शदीप भुवीला मागे टाकण्यापासून 2 विकेट्स दूर होता. तर जसप्रीत 89 विकेटसह बुमराहच्या बरोबरीचा होता. पण आता अर्शदीप हा टी20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय वेगवान गोलंदाज बनला आहे.
Most wickets for India in men’s T20is:
Yuzvendra Chahal – 96 wickets.
Arshdeep Singh – 91 wickets*.
Bhuvneshwar Kumar – 90 wickets.– ARSHDEEP MADE HIS DEBUT IN 2022…!!! 🤯🇮🇳 pic.twitter.com/L7Wyk3NWuu
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 13, 2024
टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे भारतीय गोलंदाज
96- युझवेंद्र चहल (79 डाव)
92* – अर्शदीप सिंग (59 डाव)
90- भुवनेश्वर कुमार (86 डाव)
89- जसप्रीत बुमराह (69 डाव)
88- हार्दिक पंड्या (94 डाव)
आता अर्शदीपचे लक्ष्य युझवेंद्र चहलच्या सर्वाधिक विकेट्सचे रेकॉर्ड आहे. युझवेंद्र चहलने टी20 क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक 96 विकेट घेतल्या आहेत. अर्शदीप सिंग आता या आकड्यापासून फक्त 4 विकेट्स दूर आहे. एवढेच नाही तर अर्शदीपकडे टी20 क्रिकेटमध्ये पॉवरप्लेमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज म्हणून भुवीचा विक्रम मोडण्याची उत्तम संधी आहे.
टी20 क्रिकेटमध्ये पॉवरप्लेमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज
47 – भुवनेश्वर कुमार
37 – अर्शदीप सिंग
30 – जसप्रीत बुमराह
20 – वॉशिंग्टन सुंदर
19 – आशिष नेहरा
19 – अक्षर पटेल
भारतीय वेगवान गोलंदाजांनी सर्वाधिक बळी घेतले
कसोटी – कपिल देव (434)
एकदिवसीय – जवागल श्रीनाथ (315)
टी20 – अर्शदीप सिंग (92)*
हेही वाचा-
IND vs SA; रोमांचक सामन्यात भारताचा 11 धावांनी विजय, मालिकेत 2-1 ने आघाडी
IND vs SA; तिलक वर्माचे झंझावाती शतक! भारताचे दक्षिण आफ्रिकेपुढे 220 धावांचे आव्हान
IND vs SA; ‘आधी हीरो नंतर झीरो’ बाद झाल्यानंतर संजूच्या नावावर झाला ‘हा’ लाजिरवाणा रेकाॅर्ड