सध्या भारत विरूद्ध इंग्लंड (India vs England) संघात 5 सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. त्यातील पहिला टी20 सामना (22 जानेवारी) रोजी कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर रंगला होता. या सामन्यात भारताने इंग्लंडचा 7 गडी राखून धुव्वा उडवला. या सामन्यादरम्यान भारताचा स्टार वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने (Arshdeep Singh) इतिहास रचला. तो टी20 मध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. पण दुसऱ्या सामन्यात देखील अर्शदीप इतिहास रचण्याच्या पायरीवर उभा आहे.
चेन्नई येथे होणाऱ्या इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) एक अनोखे शतक पूर्ण करू शकतो. अर्शदीप हा भारताकडून टी20 मध्ये सर्वाधिक 97 विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. पण पुढच्या सामन्यात 3 विकेट्स घेऊन तो या फॉरमॅटमध्ये 100 विकेट्स पूर्ण करेल. जर तो असे करण्यात यशस्वी झाला, तर तो टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विकेट्सचे शतक पूर्ण करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरणार आहे.
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारे 5 गोलंदाज
अर्शदीप सिंग – 97
युजवेंद्र चहल – 96
हार्दिक पांड्या – 91
भुवनेश्वर कुमार – 90
जसप्रीत बुमराह – 89
अर्शदीप सिंगच्या (Arshdeep Singh) टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने टी20 मध्ये भारतासाठी 2022 मध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून आतापर्यंत त्याने भारतासाठी 61 टी20 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 17.90च्या सरासरीने गोलंदाजी करताना 97 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. दरम्यान त्याची सर्वोत्तम गोलंदाजी 9 धावात 4 विकेट्स अशी आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी माजी क्रिकेटपटूचा पाकिस्तानला सल्ला! म्हणाला, “पाकिस्तानने फक्त…”
मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबद्दल इरफान पठाणची प्रतिक्रिया! म्हणाला, “संघ व्यवस्थापन…”
Champions Trophy; भारताच्या सामन्यांचा पाकिस्तानला होणार बंपर फायदा