आयपीएल फ्रंचायझी पंजाब किंग्ज अर्शदीप सिंगला २०१९ साली आयपीएल पदार्पण करण्याची संधी दिली होती. सध्या तो पंजाबच्या गोलंदाजी आक्रमणाचा महत्वाचा भाग आहे, पण त्याच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात मात्र खूपच खडतर राहिली आहे. चालू हंगामात पंजाबकडे कागिसो रबाडासारखा घातक वेगवान गोलंदाज असताना देखील संघ अर्शदीपला सुरुवातीच्या आणि शेवटच्या षटकांमध्ये संधी देत आला आहे. अर्शदीपचे वडील दर्शन सिंग यांनी त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांची आढवण काढली.
अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) याचे वडील दर्शन सिंग (Darshan Singh) यांनी सीआयएसएफसाठी काम केले आहे आणि सध्या सेवानिवृत्त आहेत. माध्यमांशी बोलताना दर्शन म्हणाले की, “अर्शदीपचा ट्रेनिंग कॅम्प खरडपासून जवळपास २५ किमी अंतरावर चंडीगढमध्ये होता. सरावासाठी त्याला दररोज एवढ्या लांब सायकलने प्रवास करावा लागायचा. क्रिकेट खेळणे त्याची आवड आहे. मी ड्यूटीवर आणि घरापासून लांब असायचो. पत्नी बलजीत नेहमी मुलासोबत असायची. तो कधी कधी चंडीगढ आणि खरड हे अंतर बसने देखील पार करायचा. जसवंत राय त्याला प्रशिक्षण द्यायचे.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अर्शदीपला जेव्हा पंजाब किंग्जने पहिल्यांदा संधी दिली, तेव्हा त्याला २० लाख रुपयांच्या बेस प्राईसमध्ये खरेदी केले होते. पण त्याची गुणवत्ता तपासून आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावापूर्वी पंजाब किंग्जने त्याला ४ कोटी रुपयांमध्ये रिटेन केले होते. अर्शदीप भारताच्या १९ वर्षाखालील संघाचा देखील भाग होता, ज्यांनी २०१९ मध्ये विश्वचषक जिंकला होता. परंतु त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नव्हती. त्यावेळी कमलेश नागरकोटी, इशान पारेल, शिवम मावी असे खेळाडू प्लेइंग इलेव्हनमध्ये होते आणि पृथ्वी शॉ संघाचा कर्णधार होता. पण आज परिस्थिती अशी आहे की, त्यावेळच्या संघातील इतर खेळाडूंपेक्षा अर्शदीपकडे अधिक गुणवत्ता आणि उत्कृष्ट फॉर्म दिसत आहे.
दरम्यान, राजस्थान रॉयल्सविरुद्ध ६ मे रोजी पंजाब किंग्जकडून खेळलेल्या शेवटच्या सामन्यात त्याने २९ धावा खर्च करून दोन महत्वाच्या विकेट्स घेतल्या होत्या. चालू हंगामात अर्शदीपला अधिक विकेट्स जरी मिळाल्या नसल्या, तरी त्याने संघासाठी किफायतशीर गोलंदाजी नक्कीच केली आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘काहीतरी मोठे होणार आहे’, रोहित शर्माबद्दल भारताच्या दिग्गज अष्टपैलूची खास भविष्यवाणी
आयपीएल २०२२ ला लागणार समारोप समारंभाचा तडका, ‘या’ सेलिब्रेटिंचा परफॉर्मन्स होण्याची शक्यता