मुंबई। वानखेडे स्टेडियमवर सोमवारी (२५ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामातील (IPL 2022) ३८ वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात पार पडला. या सामन्यात पंजाब किंग्सने ११ धावांनी विजय मिळवला. पंजाबचा हा हंगामातील चौथा विजय होता. पंजाबच्या या विजयात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगचा महत्त्वाचा वाटा होता. दरम्यान, त्याने या सामन्यात विकेट घेतल्यानंतर केलेले सेलिब्रेशन चांगलेच चर्चेत आले आहे.
अर्शदीपचे अनोखे सेलिब्रेशन
सोमवारी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध अर्शदीपने (Arshdeep Singh) ४ षटके गोलंदाजी करताना २३ धावा देत एक विकेट घेतली. ही विकेट त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या मिशेल सँटेनरची (Mitchell Santner) घेतली. चेन्नई सुपर किंग्सची फलंदाजी सुरू असताना सहाव्या षटकात तिसर्या चेंडूवर अर्शदीपने सँटेनरला त्रिफळाचीत केले. त्याला बाद केल्यानंतर अर्शदीपने कमालीचे सेलिब्रेशन केले.
अर्शदीपने सँटेनरला बाद केल्यानंतर घोडेस्वारी सारखी कृती करत सेलिब्रेश केले होते. त्याच्या या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत असून क्रिकेट चाहते विविध प्रतिक्रिया देत आहेत (Arshdeep Singh ‘horse riding’ celebration).
https://twitter.com/daman_yadav_7/status/1518842844357791745
व्हिडिओ पाहाण्यासाठी येथे क्लिक करा
अर्शदीपची शानदार गोलंदाजी
अर्शदीपने चेन्नई विरुद्ध ४ षटकांत सँटेनरची विकेट घेण्याबरोबर धावांनाही बांध लावला होता. त्याने केवळ ५.८० च्या इकोनॉमी रेटने धावा दिल्या. दरम्यान, त्याने जेव्हा चेन्नईचे फलंदाज अखेरच्या षटकांमध्ये आक्रमक होण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा १७ व्या षटकात अर्शदीपने ६ आणि १९ व्या षटकात ८ धावा दिल्या. त्यामुळे चेन्नईला अखेरच्या षटकामध्ये तब्बल २७ धावांची गरज होती. या धावा चेन्नईकडून रविंद्र जडेजा आणि एमएस धोनीला करता आल्या नाहीत.
Leg-stump goes for a cart-wheel 😍
Arsh goes for a horse ride! 🏇🏻#SaddaPunjab #IPL2022 #PunjabKings #ਸਾਡਾਪੰਜਾਬ #PBKSvCSK pic.twitter.com/3eGEKNoBnl— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 25, 2022
पंजाबने जिंकला सामना
सोमवारी झालेल्या सामन्यात पंजाबने चेन्नईसमोर शिखर धवनच्या ८८ धावांच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर २० षटकांत ४ बाद १८७ धावा करत १८८ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला २० षटकांत ६ बाद १७६ धावाच करता आल्या. चेन्नईकडून अंबाती रायुडूने ७८ धावांची खेळी केली. मात्र, अन्य कोणाला फार काही करता आले नाही. त्यामुळे पंजाबने ११ धावांनी विजय मिळवला.
गोलंदाजीत चेन्नईकडून ड्वेन ब्रावोने २ आणि महिशा तिक्षणाने १ विकेट घेतली. तसेच पंजाबकडून कागिसो रबाडा आणि रिषी धवनने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या, तर अर्शदीप आणि संदीप शर्माने प्रत्येकी १ विकेट घेतली.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
‘त्याचीच कमी भासतेय’, चेन्नईच्या ६ व्या पराभवानंतर कर्णधार जडेजाने सांगितली संघातील कमजोरी
शिखर धवनचे विक्रमी अर्धशतक! चेन्नईविरुद्ध ८८ धावा ठोकत विराट, रोहितच्या पंक्तीत स्थान
IPL| चेन्नईविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवण्यात पंजाब दुसऱ्या क्रमांकावर, यादीत ‘हा’ संघ अव्वल