कोलकाता येथे झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात इंग्लंडचा पराभव करून भारताने पाच सामन्यांच्या टी20 मालिकेची दमदार सुरुवात केली. ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत इंग्लंडच्या स्फोटक फलंदाजीला फक्त 132 धावांवर रोखले. अर्शदीपने इंग्लंडला सुरुवातीलाच धक्का दिला. त्यानंतर वरुण चक्रवर्तीने 23 धावांत तीन बळी घेतले. ज्यामुळे इंग्लंडचा टाॅप ऑर्डर गडगडला. परिणामी इंग्लंडला पुनरागमनाची संधी मिळाली नाही. या सामन्यात, अर्शदीप आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाजही बनला. आज खेळवल्या जाणाऱ्या दुसऱ्या टी20 सामन्यात अर्शदीप सिंगला पाकिस्तानच्या हरिस रौफचा मोठा विक्रम मोडण्याची संधी असेल.
गुरुवारी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात अर्शदीप सिंगने युझवेंद्र चहलचा विक्रम मोडला. चहलने भारतासाठी 96 विकेट्स घेतल्या आहेत. तर अर्शदीपच्या नावावर आता 97 विकेट्स आहेत. अर्शदीपला टी20 मध्ये सर्वात जलद 100 बळी घेणारा गोलंदाज बनण्यासाठी फक्त तीन बळींची आवश्यकता आहे. हा विक्रम हरिस रौफच्या नावावर आहे. ज्याने 71 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली. अर्शदीपने 61 सामने खेळले आहेत आणि हरिस रौफचा विक्रम मोडण्यासाठी त्याला 10 सामने शिल्लक आहेत.
आजच्या सामन्यात जर अर्शदीपने तीन विकेट्स घेतल्या तर तो टी20 क्रिकेटमध्ये 100 विकेट्स घेणारा जगातील तिसरा सर्वात जलद गोलंदाज बनेल. त्याच्याआधी 53 सामन्यांमध्ये 100 टी20 विकेट्स घेणारा सर्वात जलद गोलंदाज रशीद खान आहे. त्यानंतर संदीप लामिछाने आहे. ज्याने 54 सामन्यांमध्ये 100 विकेट्स घेतल्या आहेत. 63 सामन्यांमध्ये 100 विकेट्ससह वानिंदू हसरंगा तिसऱ्या स्थानावर आहे.
हेही वाचा-
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियासाठी हा खेळाडू ‘X’ फॅक्टर ठरणार, माजी क्रिकेटपटूची भविष्यवाणी
38 वर्षाय खेळाडूनं रचला पकिस्तान क्रिकेटमध्ये नवा इतिहास, अशी कमागिरी करणारा प्रथमच!
सूर्यकुमार यादव सिक्सर किंग रोहित शर्माच्या खास क्लबमध्ये प्रवेश करणार? करावा लागेल हा पराक्रम