---Advertisement---

चहर-अर्शदीपचा कहर! एकाच षटकात मिळवले तीन बळी; दक्षिण आफ्रिका 3 षटकात 5 बाद 14

---Advertisement---

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला बुधवारी (28 सप्टेंबर) तिरुअनंतपुरम येथे सुरुवात झाली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आशिया चषकानंतर डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याने शानदार पुनरागमन करत दक्षिण आफ्रिकेचा डाव उध्वस्त केला.

 

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत बाकावर बसावे लागल्यानंतर दीपक चहर व अर्शदीप सिंग यांनी भारतीय संघात पुनरागमन केले. दीपकने पहिल्या शतकाच्या अखेरच्या चेंडूवर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बवुमा याचा त्रिफळा उडवत संघाला पहिला बळी मिळवून दिला. त्यानंतर दुसरे षटक टाकण्यासाठी आलेल्या अर्शदीपने दुसऱ्या चेंडूवर क्विंटन डी कॉक, पाचव्या चेंडूवर रायली रुसो आणि अखेरच्या चेंडूवर डेव्हिड मिलर यांच्या दांड्या वाकवत दक्षिण आफ्रिकेच्य डावाची वाताहात केली. तिसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर दीपकने पुन्हा एकदा बळी मिळवला. त्याने युवा फलंदाज ट्रिस्टन स्टब्सला अर्शदीपकरवी झेलबाद केले. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 5 बाद 9 अशी होती. टी20 क्रिकेटच्या इतिहासात इतकी खराब कामगिरी आजवर कोणत्याही संघाने केली नव्हती.

 

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---