---Advertisement---

टीम बसमध्ये असताना अर्शदीपला मिळाली भारतीय संघातील निवडीची बातमी, खुद्द केला खुलासा

On: सोमवार, मे 23, 2022 4:32 PM
Arshdeep -Singh
---Advertisement---

आयपीएल २०२२ मध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या अर्शदीप सिंग याला आगामी भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका दरम्यान खेळल्या जाणाऱ्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे. भारतीय संघात स्थान मिळाल्यानंतर अर्शदीपचा आनंद गगनात मावत नव्हता असा खुलासा खुद्द अर्शदीपने केला आहे. शिवाय पंजाबच्या संघातील अनुभवी खेळाडूंसोबत खेळल्याचा फायदा झाला असल्याचंही अर्शदीपने सांगितले.

रविवारी (२२ मे) सनरायझर्स हैदराबादविरुद्ध पंजाबचा शेवटचा आयपीएल सामना खेळणार असताना अर्शदीप सिंगला ही आनंदाची बातमी मिळाली. पंजाब किंग्जने या सामन्यात ५ विकेट्सने विजय मिळवल्यानंतर अर्शदीपने त्याचा सहकारी हरप्रीत ब्रारला सांगितले की, ‘मला सामन्यापूर्वी टीम बसमध्ये असताना बातमी मिळाली की माझी भारतीय संघात निवड झाली आहे. सामना होणार होता, त्यामुळे मला फारसे काही वाटले नाही. परंतू सामना जिंकल्यानंतर झालेला आनंद गगनात मावेनासा होता.’

पंजाबमधील सलामीवीर शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, मयंक अग्रवाल, जॉनी बेयरस्टो यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंच्या अनुभवाचा वेळोवेळी फायदा झाल्याचे सांगत नेटमध्ये गोलंदाजी केल्यामुळे आत्मविश्वास वाढला आणि गोलंदाजीत अचुकता आणता आली असेही अर्शदीपने स्पष्ट केले.

दरम्यान, भारत विरुद्ध साऊथ अफ्रिका दरम्यान होणारी टी२० मालिका ९ जूनपासून सुरू होत आहे. मालिकेत अनुक्रमे ९ जून, १२ जून, १४ जून, १७ जून आणि १९ जून असे पाच सामने खेळण्यात येणार आहेत. यासाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. जाहीर झालेल्या संघातून रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्यात आली आहे. सोबतचं अर्शदीप सिंह, उमरान मलिक सारख्या अनेक नविन खेळाडूंना संधी उपलब्ध करून दिली आहे. शिवाय दिनेश कार्तिकसह अनेक खेळाडूंना पुन्हा भारतीय संघात स्थान मिळवण्यात यश आले आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघ
केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (उपकर्णधार/यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आर बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

Video: थोडक्यात बचावला राजस्थान संघ! कोलकाताला जाताना विमान प्रवासादरम्यान टळले मोठे संकट

फॉर्मात असलेल्या पुजाराचे टीम इंडियात पुनरागमन; प्रतिक्रिया देताना म्हणाला, ‘माझी निवड झाल्याचा..’

धवनचा ‘गब्बर’ विक्रम, आयपीएलमध्ये असा किर्तीमान करणारा बनला जगातील पहिलाच फलंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---