आयसीसीचा प्रतिष्ठेचा असा ८वा टी२० विश्वचषक (T20 World Cup) सध्या ऑस्ट्रेलियात खेळवला जात आहे. या विश्वचषकातील चौथा सामना पांरपारिक प्रतिस्पर्धी भारत विरुद्ध पाकिस्तान संघात झाला. यात भारताने जबरदस्त सुरुवात केली. भारतीय गोलंदाजांनी यावेळी पाकिस्तानी फलंदाजांना अजिबात हावी होऊ दिले नाही. यात अर्शदीप सिंग याने तर जबरदस्त कामगिरी केली.
२०२१ विश्वचषकात भारत पाकिस्तान संघ जेव्हा आमने-सामने आले होते, तेव्हा शाहिन आफ्रिदी याने केएल राहुलला ३ तर रोहित शर्माला ० धावेवर बाद केले. पुढे हा सामना भारताने तब्बल १० विकेटने गमावला होता. शाहिन आफ्रिदीने तिसऱ्या षटकाच्या आतच भारतीय सलामीवीरांना तंबूत पाठवले होते.
सध्या सुरु असलेल्या विश्वचषकात अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) याने मोहम्मद रिझवानला ४ तर बाबर आझमला ० धावेवर बाद केले. यावेळीही पाकिस्तानचे सलामीवीर पॉवर प्लेच्या आधीच तंबूत गेले. यामुळे अर्शदिपने तेच केले जे शाहिन आफ्रिदीने १६ मार्च २०२१ला भारताविरुद्ध केले होते.
या सामन्यात भारताकडून हार्दिक पंड्या, अर्शदीप सिंग व मोहम्मद शमीने जबरदस्त कामगिरी केली.
भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध टी२० विश्वचषकात आजपर्यंत ६ सामने खेळला असून त्यात ५ विजय व १ पराभव टीम इंडियाने पाहिले आहेत. आजचा या दोन संघांमधील ७वा सामना असून भारताच्या विजयाच्या अपेक्षा चाहत्यांना आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जे धोनीलाही जमलं नाही, ते रोहितनं करून दाखवलं; रेकॉर्ड पाहून तुम्हीही म्हणाल, ‘जिंकलंस भावा’
नाद केला पण पुरा केला! अर्शदीप पाकिस्तानची ‘अशी’ अवस्था करणारा जगातला पहिला गोलंदाज