पाकिस्तान क्रिकेट बोर्ड त्यांच्या संघासाठी नव्या प्रशिक्षकाच्या शोधात आहे. मुख्य प्रशिक्षक सकलेन मुश्ताक लवकरच आपल्या पदावरून पदमुक्त होणार आहेत. पीसीबी त्यामुळे लवकरात लवकर नवे प्रशिक्षक नियुक्त करण्याचा विचार करत आहे. मात्र, त्यांच्या या निर्णयाला सध्या अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी लाल कंदील दाखवलेला दिसून येतोय.
सततच्या खराब कामगिरीनंतर पाकिस्तान संघाने सकलेन मुश्ताक यांना हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यानंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून माजी प्रशिक्षक मिकी आर्थर यांना पीसीबीने विचारणा केली होती. मात्र, त्यांनी आपल्याला पाकिस्तान संघासह काम करण्याची अजिबात इच्छा नसल्याचे म्हटलेले. त्यांच्यानंतर ऑस्ट्रेलियाचे टॉम मूडी व झिम्बाब्वेचे ऍंडी फ्लॉवर यांना देखील या पदासाठी विचारण्यात आलेले. मात्र, त्यांनी देखील या पदासाठी आपला नकार कळवला आहे. विदेशी प्रशिक्षक पाकिस्तान संघासह काम करण्यास इच्छुक नसल्याने पाकिस्तानला पुन्हा एकदा स्वदेशी प्रशिक्षकालाच ही जबाबदारी द्यावी लागू शकते. सध्या संघाचे मुख्य निवडसमिती अध्यक्ष असलेल्या शाहिद आफ्रिदी यांनी यापूर्वी हे पद भूषवण्याची इच्छा व्यक्त केली होती.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डात मोठा फेरबदल पाहायला मिळाला. रमीज राजांना पीसीबी अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर नजम सेठींकडे ही जबाबदारी पुन्हा एकदा सोपवण्यात आली. अध्यक्षांसह बोर्डातील इतर महत्वाच्या पदांवर देखील नवीन नावांची निवड केली गेली. अशात आता सध्याचे मुख्य प्रशिक्षक सकलेन मुश्ताक यांना देखील जबाबदारीतून मुक्त केले जाणार असल्याचे सांगितले जाते. फेब्रुवारी 2023 मध्ये मुश्ताक यांचा संघासोबतचा कार्यकाळ संपणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनात पाकिस्तान संघ मागच्या वर्षी विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यापर्यंत पोहोचला होता.
(Arthur Moody And Flower Denied Pakistan Head Coach Post)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय क्रीडाक्षेत्राला मोठा धक्का! स्टार खेळाडू डोपिंग चाचणीत पाॅझिटिव्ह
द्विशतक होताच सचिनकडून साराचा शुबमनसोबत साखरपुडा फिक्स? ट्विट होतंय व्हायरल