सय्यद मुश्ताक अली स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात आज तामिळनाडूच्या संघाने राजस्थानचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. अरुण कार्तिकची धुवाधार खेळी आणि मध्यमगती गोलंदाज मोहम्मद याने टिपलेले ४ बळी, हे तामिळनाडूच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले. मात्र अशोक मणेरियाच्या नेतृत्वाखालील राजस्थान संघाचे अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्न धुळीला मिळाले.
राजस्थानच्या फलंदाजांची हाराकिरी
अहमदाबादच्या सरदार पटेल मैदानावर खेळवल्या गेलेल्या या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र पहिल्याच षटकात त्यांचा सलामीवीर भरत शर्मा खातेही न उघडता तंबूत परतला. मात्र त्यांनतर कर्णधार अशोक मणेरियाने संघाचा डाव सावरला. त्याने ५१ धावांची खेळी करताना संघाचा धावफलक हलता ठेवला होता. मात्र १४व्या षटकात संघाच्या १२० धावा झाल्या असताना तो बाद झाला आणि त्यांनतर राजस्थानची घसरगुंडी उडाली.
राजस्थानने शेवटच्या ८ षटकात केवळ ४४ धावा करताना ७ गडी गमावले. त्यामुळे निर्धारित २० षटकांच्या अखेरीस त्यांनी ९ बाद १५४ अशी धावसंख्या उभारली. तामिळनाडूकडून मध्यमगती गोलंदाज मोहम्मदने अप्रतिम गोलंदाजी करत ४ षटकात २४ धावा देत २ बळी घेतले. त्याला साई किशोरने १६ धावांत २ बळी घेत सुयोग्य साथ दिली.
Tamil Nadu march into the final! 👍👍
The @DineshKarthik-led unit beat Rajasthan by 7⃣ wickets to seal a place in the summit clash. 👏👏 #TNvRAJ #SyedMushtaqAliT20 #SF1 | @TNCACricket
Scorecard 👉 https://t.co/Y5DkQ6696D pic.twitter.com/XSDihUgY3E
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 29, 2021
अनुभवी शिलेदारांची जबाबदार फलंदाजी
१५५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना तामिळनाडूची सुरुवातही फार चांगली झाली नाही. अवघ्या १७ धावांवर त्यांचे दोन फलंदाज बाद होऊन माघारी परतले होते. मात्र त्यांनतर अनुभवी अरुण कार्तिकने सलामीवीर नारायणन जगदीशनच्या साथीने डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी ५२ धावांची भागीदारी केली. राजस्थानचा युवा लेगस्पिनर रवी बिश्नोईने जगदीशनला वैयक्तिक २८ धावांवर बाद करत राजस्थानला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी उपलब्ध करून दिली.
मात्र पाचव्या क्रमांकावर आलेल्या कर्णधार दिनेश कार्तिकने आपल्या अनुभवाच्या बळावर अरुण कार्तिकला योग्य साथ देत तामिळनाडूला विजयापर्यंत नेले. अरुण कार्तिकने ५४ चेंडूत ८९ धावांची आतिशी खेळी साकारली, तर दिनेश कार्तिकने १७ चेंडूत २६ धावा करत संघाला विजयी रेषा पार करून दिली. राजस्थानकडून तन्वीर-उल-हक, खलील अहमद आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
A well-compiled half-century for Tamil Nadu's Arun Karthik! 👍👍 #TNvRAJ #SyedMushtaqAliT20 #SF1
Follow the match 👉 https://t.co/Y5DkQ6696D pic.twitter.com/IN2t6eYGEN
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 29, 2021
आपल्या धुवाधार खेळीने संघाला विजय मिळवून देणाऱ्या अरुण कार्तिकला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अंतिम फेरीत तामिळनाडूचा सामना आता बडोदा आणि पंजाब यांच्यातील विजेत्याशी होईल.
महत्वाच्या बातम्या:
PAK vs SA : फिरकीच्या जाळ्यात फसला पाहुणा संघ, कराची कसोटीत पाकिस्तानचा दमदार विजय
इंग्लंडकडे काही दमदार खेळाडू आहेत, जे भारताला देऊ शकतात आव्हान, माजी दिग्गजाचे भाष्य
रिषभ पंत भविष्यातील स्टार, भारताच्या फलंदाजी प्रशिक्षकांनी केली मुक्तकंठाने प्रशंसा