पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित आयकॉन- अरुण साने मेमोरियल हौशी टेनिस लीग स्पर्धेत सोलारिस आरपीटीए, गोल्डन बॉईज, डायमंड्स, मॉर्निंग स्टार्स या संघांनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून आगेकूच केली.
पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत सोलारिस आरपीटीए संघाने टेनिस नट्स संघाचा 14-8असा पराभव केला. विजयी संघाकडून जयंत पवार, संदीप आगते, रवी कात्रे, महेश बर्वे यांनी सुरेख कामगिरी केली. अमित पाटणकर, जितेंद्र जोशी, मुकुंद जोशी, चिराग रूनवाल, आशिष पुंगलिया, अमित सुमंत यांनी केलेल्या विजयी कामगिरीच्या जोरावर गोल्डन बॉईज संघाने ओडीएमटी संघाचा 18-5असा पराभव करून आगेकूच केली. अन्य लढतीत डायमंड्स संघाने महाराष्ट्र मंडळचा 18-5असा तर, मॉर्निंग स्टार्स संघाने एफसी क संघाचा 18-7असा पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
सोलारिस आरपीटीए वि.वि.टेनिस नट्स 14-8(80अधिक गट: जयंत पवार/संदीप आगते वि.वि.अमित किंडो/कुमार 6-2; खुला गट: सिद्धू भरामगोंडे/गिरीश साने पराभूत वि.जॉर्ज वर्घसे/रवी कोठारी 2-6; रवी कात्रे/महेश बर्वे वि.वि.जय बॅनर्जी/अंकित कापसे 6-0);
गोल्डन बॉईज वि.वि.ओडीएमटी 18-5(80अधिक गट: अमित पाटणकर/जितेंद्र जोशी वि.वि.सुहास महापरी/राम नायर 6-3; खुला गट: मुकुंद जोशी/चिराग रूनवाल वि.वि.अतुल मांडवकर/चंदन 6-2; आशिष पुंगलिया/अमित सुमंत वि.वि.कौस्तुभ देशमुख/हिमांश कपटीया 6-0);
डायमंड्स वि.वि.महाराष्ट्र मंडळ 18-5(80अधिक गट: डॉ साठे/अमित लाटे वि.वि.अर्पित श्रॉफ/संजय सेठी 6-2; खुला गट: कौस्तुभ शहा/सारंग देवी वि.वि.अभिषेक चरण/विक्रम श्रीश्रीमल 6-2; मिहीर दिवेकर/राजू कांगो वि.वि.विकास बचलू/विशाल पटेल 6-1);
मॉर्निंग स्टार्स वि.वि.एफसी क 18-7(80अधिक गट: राम मोने/चकोर गांधी वि.वि.सिद्धेश पाबळकर/चिंतामणी चितळे 6-4; खुला गट: प्रकाश चांदोरकर/गीता गोडबोले वि.वि.सिद्धार्थ साठे/चिन्मय दांडेकर 6-3; नवीन भंडारी/संतोष कटारिया वि.वि.कपिल जोशी/धैर्यशील तावरे 6-0).