ऑस्ट्रेलियाला गुरुवारी (12 ऑक्टोबर) विश्वचषक 2023 मधील दहाव्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून 134 धावांनी मोठा पराभव स्विकारावा लागला. लखनऊच्या इकाना स्टेडिअमवर खेळलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 7 विकेट्स गमावून 311 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संपुर्ण संघ 40.5 षटकांत 177 धावांवर सर्वबाद झाला.
ऑस्ट्रेलियाने याअगोदर सर्वात कमी धावसंख्या 2011 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध केली होती. त्यावेळी त्यांचा सर्व संघ 176 धावांवर सर्वबाद झाला होता. श्रीलंकेत झालेला हा सामना पाकिस्तानने 6 विकेट्सने जिंकला होता. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकाविरुद्ध ऑस्ट्रेलिया संघाच्या नावे एक लाजिरवाना विक्रम झाला आहे.
दक्षिण आफ्रिकेकडून ऑस्ट्रेलिया संघ सलग 4 वनडे सामन्यात शंभरपेक्षा जास्त धावांनी पराभूत झाला आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलिया कोणत्याही संघाकडून वनडे क्रिकेटमध्ये सलग चार वेळा शंभरपेक्षा धावांनी पराभूत झाला नव्हता. परंतु आफ्रिकेकडून वनडे क्रिकेटमध्ये त्यांना सलग 4 वेळा असा मोठा पराभव स्विकारावा लागला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सप्टेंबर महिन्यात 5 सामन्यांची वनडे मालिका झाली होती. ज्यात पहिले दोन सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले होते. पण आफ्रिकेने पुनरागमन करत तिसरा सामना 111 धावांनी जिंकला. तर चौथा 164 व पाचवा सामना 122 धावांनी जिंकला. त्यातच गुरुवारी विश्वचषकातील सामन्यात 134 धावांनी पराभूत करत दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध इतिहास रचला आहे. (As soon as they lost in the World Cup against South Africa Australia had an embarrassing record)
मागच्या चार वनडे सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दक्षिण आफ्रिका संघाची कामगिरी
– 111 धावांनी विजय
– 164 धावांनी विजय
– 122 धावांनी विजय
– 134 धावांनी विजय
महत्वाच्या बातम्या –
एमटी आयटीएफ एस 400 वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत राधिका कानिटकरला तिहेरी मुकुट
दक्षिण आफ्रिकेने ठेचल्या ऑस्ट्रेलियाच्या नांग्या, आख्खा संघ ‘इतक्या’ धावांवर गारद, गुणतालिकेत जबरदस्त फेरबदल