---Advertisement---

अफगाणिस्तानच्या कर्णधारानं घडवला इतिहास; ‘कॅप्टनकूल’ धोनीच्या विश्वविक्रमाची केली बरोबरी

On: शुक्रवार, मार्च 19, 2021 11:50 PM
---Advertisement---

अबुधाबी। अफगाणिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे संघात शुक्रवारी (१९ मार्च) ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसरा सामना पार पडला. हा सामना अफगाणिस्तानने ४५ धावांनी जिंकला. याबरोबरच मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. तसेच हा विजय अफगाणिस्तानचा कर्णधार असगर अफगाण याच्यासाठीही खास ठरला आहे. त्याने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे.

अफगाण हा अफगाणिस्तानचा दिग्गज कर्णधार म्हणून ओळखला जातो. त्याने आत्तापर्यंत ५१ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात अफगाणिस्तानचे नेतृत्व केले आहे. त्यातील ४१ सामन्यात विजय मिळवला आहे. तर ९ सामन्यात पराभव स्विकारला असून १ सामना बरोबरीत सुटला आहे.

त्यामुळे आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या कर्णधारांच्या यादीत अफगाणने अव्वल क्रमांकावर असलेल्या धोनीची बरोबरी केली आहे. धोनीनेही कर्णधार म्हणून ४१ आंतरराष्ट्रीय टी२० सामने जिंकले आहेत. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा कर्णधार ओएन मॉर्गन आहे. त्याने ३३ आंतरराष्ट्रीय टी२० सामने कर्णधार म्हणून जिंकले आहेत.

अफगाणिस्तानने जिंकला सामना 

या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५ बाद १९३ धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून करिम जामतने सर्वाधिक ५३ धावा केल्या. तर उस्मान घणीने ४९ धावा केल्या आणि मोहम्मद नबीने ४० धावा केल्या. झिम्बाब्वेकडून ब्लेसिंग मुझराबनीने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.

त्यानंतर १९४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाम्वेने १७.१ षटकात सर्वबाद १४८ धावाच केल्या. त्यांच्याकडून रायन बर्लने ४० धावा करत एकाकी झुंज दिली. अफगाणिस्तानकडून राशिद खानने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.

महत्त्वाच्या बातम्या –

इंग्लंडने चौथा टी२० सामना तर हरलाच पण आयसीसीने ‘ही’ शिक्षाही सुनावली

रोहित शर्माने १० वर्षांपूर्वी सुर्यकुमारबद्दल केलेलं ‘ते’ ट्विट होतंय व्हायरल, पाहा काय होतं ट्विट

सुर्यकुमारच्या वादग्रस्त विकेटवर केवळ आजी-माजी क्रिकेटपटूंनीच नाही तर ‘या’ बॉलिवूड स्टार्सनेही व्यक्त केली नाराजी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---