2015 आणि 2016मध्ये महिलांच्या बिग बॅश लीगमध्ये खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या अॅशलेंघ बार्टीने 2018च्या युएस ओपन महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे.
बार्टीने जोडीदार कोको वॅंडेवेघेच्या मदतीने हे विजेतेपद जिंकले आहे. 22वर्षीय बार्टी 2010मध्ये टेनिसची व्यावसायिक खेळाडू बनली. त्यानंतर तिने 2014ला टेनिसमधून काही काळ ब्रेक घेऊन क्रिकेटकडे कल वाढवला. तर 2016ला ती परत टेनिसकडे वळाली.
या सामन्यात बार्टी आणि वॅंडेवेघे या जोडीने अंतिम सामन्यात टायमा बॅबोस आणि क्रिस्टीना म्लादेनोविचला 7-6, 7-6 असे पराभूत केले. तेरावे मानांकन असणाऱ्या या जोडीने तिसऱ्या मांनाकित जोडीला या सामन्यात चांगलेच झुंजवले. हा सामना सुमारे दोन तास 32 मिनिटे चालला.
“भुतकाळात घडलेल्या घटनांनी मला खुप काही शिकवले. त्यामुळे मी आज इथे आहे”, असे बार्टी म्हणाली.
“या विजयासाठी आम्ही मागील दोन वर्षांपासून कसून सराव केला आहे. यामध्ये आम्हाला यश मिळाले याबद्दल आनंद आहे”, असे ती पुढे म्हणाली.
या दोघी मायामी आणि इंडियन वेल्स या स्पर्धेत एकत्र खेळल्या आहेत. तसेच या स्पर्धेतील महिला स्पोर्ट्समनशीपचा पुरस्कार बार्टीला मिळाला आहे.
🇺🇸😙🏆😙🇦🇺
Your 2018 Women's Doubles Champions…
Congratulations @CoCoVandey & @ashbar96!#USOpen pic.twitter.com/TnvNuwWe9W
— US Open Tennis (@usopen) September 9, 2018
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–ला लीगा: स्पेन फुटबॉल असोसिएशन ठरवणार अमेरिकेत या संघांना खेळावायचे की नाही
–एमएमएच्या प्रचारासाठी माइक टायसन येणार मुंबईत
–२०१९ मध्ये आयपीएल जाणार भारताबाहेर?