ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या ऍशेस मालिकेतील (Ashes Series) चौथा सामना बुधवारी (५ जानेवारी) सिडनीमध्ये सुरू झाला. इंग्लंडने मालिकेतील पहिले तिन्ही सामने मगावल्यामुळे ऑस्ट्रेलियाने ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. संपूर्ण मालिकेत ज्याप्रकारे खेळाडूंचे उत्कृष्ट प्रदर्शन पाहायला मिळाले, तसेच चाहत्यांचे वेगवेगळे प्रकार देखील दिसले. सिडनीतील कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले, जेव्हा इंग्लंडचा फिरकी गोलंदाज जॅक लीच (Jack Leach) याने एका चाहत्याच्या डोक्यावर (Jack Leach Autograph) स्वाक्षरी दिली.
सिडनी कसोटी सामन्यात पहिल्या दिवशीच्या तिसऱ्या सत्रात हा प्रसंग घडला. त्यावेळी ऑस्ट्रेलिया संघ फलंदाजी करत होता आणि धावसंख्या होती, तीन बाद ११७ धावा. ऑस्ट्रेलियाचे स्टीव्ह स्मिथ आणि उस्मान ख्वाजा खेळपट्टीवर होते. इंग्लंडचा फिरकी गोलंदाज जॅक लीच सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षणासाठी उभा होता.
अशातच स्टॅन्ड्समधील एका चाहत्याने लीचकडे स्वाक्षरीची मागणी केली. त्याची मागणी स्वीकारत लीच त्याच्या जवळ गेला, पण तेवढ्यात चाहत्याने स्वक्षरी घेण्यासाठी स्वतःचे डोके पुढे केले. त्या चाहत्याच्या डोक्यावर अजिबात केस नसून टक्कल होती. लीचने देखील क्षणाचाही विलंब न करता चाहत्याच्या डोक्यावर स्वाक्षरी केली. सोशल मीडियावर या प्रसंगाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
Jack Leach signing a guy's head 😂 #Ashes pic.twitter.com/g6JL6xaqiC
— 7Cricket (@7Cricket) January 5, 2022
दरम्यान, सामन्याच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मार्कस हॅरिस आणि डेविड वॉर्नरने ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून दिली होती. परंतु संघाची धावसंख्या ५१ असताना वॉर्नर ३० धावा करून तंबूत परतला. त्यानंतर मार्नस लाबुशेनने हॅरिससोबत डाव सांभाळला आणि दुसऱ्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी केली. पण हॅरिसदेखील ३८ धावा करून बाद झाला. त्यानंतर लाबुशेनने देखील २८ धावा करून विकेट गमावली.
पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने ४६.५ षटकांचा सामना केला आणि यामध्ये ३ विकेट्सच्या नुकसानावर १२६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचे स्टीव स्मिथ ६ आणि उस्मान ख्वाजा ४ धावांसह खेळपट्टीवर कायम आहेत. दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा डाव इथून पुढे सुरू होईल.
महत्वाच्या बातम्या –
‘चौथ्या सांघिक आंतर क्लब टेनिस स्पर्धेत ३१ संघ सहभागी, ८ जानेवारीपासून स्पर्धेस प्रारंभ
Video: अवघ्या २ सेकंदात बदलला अंपायरने निर्णय आणि तंबूत परतला अजिंक्य रहाणे
टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत 18 व्या मानांकित कारास्तेवसह अव्वल 100 खेळाडूमधील आठ खेळाडूंचे आकर्षण
व्हिडिओ पाहा –