ऍशेस मालिकेतील (ashes series) दुसऱ्या कसोटी सामन्यात एक असा नजारा पाहायला मिळाला, जो पाहून सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंड संघाचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सन (ollie robinson) अचानकपणे फिरकी गोलंदाजी करू लागला. ज्यांना रॉबिन्सनने टाकलेले हे षटक पाहायला मिळाले, त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. विशेष म्हणजे त्याने ऑफ स्पिन गोलंदाजी करत टाकलेले हे षटक संघासाठी किफायतशीर ठरले.
तर झाले असे की, दुसऱ्या सामन्यातील दुसऱ्या डावात रॉबिन्सन इंग्लंडसाठी ३५ व्या षटकात गोलंदाजी करायला आला होता. परंतु त्याने विरोधी ऑस्ट्रेलिया संघाच्या फलंदाजांना चकित केले. या षटकात ऑस्ट्रेलियाचे ट्रेविस हेड आणि मार्नश लाबुशेन खेळपट्टीवर फलंदाजासाठी उपस्थित होते.
England pacer Ollie Robinson bowling offspin #Ashes pic.twitter.com/Jm5bUTj4ii
— Kaveen (@Kaveen0724) December 19, 2021
आपण सर्वांनी रॉबिन्सनला आतापर्यंत वेगवान गोलंदाजी करताना पाहिले आहे, पण त्याने अचानकपणे जर फिरकी गोलंदाजीला सुरुवात केली, तर प्रत्येकाला आश्चर्य वाटणार, यात शंका नाही. खेळपट्टीवरील फलंदाजांनाही असेच आश्चर्य वाटले. रॉबिन्सच्या या षटकात त्याने फक्त २ धावा दिल्या. चाहते सोशल मीडियावार त्याच्या या फिरकी गोलंदाजीविषयी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. आयसीसीने देखील रॉबिन्सनच्या या गोलंदाजीविषयी खास पोस्ट केली आहे.
🚨 Ollie Robinson off-spin alert 🚨#Ashes pic.twitter.com/elhB1U7uGl
— 7Cricket (@7Cricket) December 19, 2021
(•_•)
<) )╯QUICK
/(•_•)
( (> BOWLING
/(•_•)
<) )> SPIN
/Ollie Robinson, everybody! #Ashes pic.twitter.com/Uoa4bwnRF2
— cricket.com.au (@cricketcomau) December 19, 2021
ऍशेसच्या पहिल्या सामन्यात आयसीसीने संपूर्ण इंग्लंड संघावर आयसीसीने दंड लावला होता. इंग्लंड संघाने या सामन्यात गोलंदाजीसाठी अपेक्षित वेळेपेक्षा जास्त वेळ घेतला होता, त्यामुळे आयसीसीने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली होती. आता या दुसऱ्या सामन्यात गोलंदाजी वेळेत उरकण्यासाठी रॉबिन्सनने फिरकी गोलंदाजीचा पर्याय निवडल्याचे देखील सांगितले जात आहे.
दरम्यान, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने त्यांच्या दुसऱ्या डावात एक बाद ४५ धावा केल्या होत्या. चौथ्या दिवशी ४५ धावांच्या पुढे ऑस्ट्रेलियाने खेळायला सुरुवात केली आणि ९ बाद २३० धावांवर डाव घोषित केला. ऑस्ट्रेलियाने शेवटच्या डावात इंग्लंडपुढे विजयासाठी ४६८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने ४ विकेट्सच्या नुकसानावर ८२ धावा केल्या आहेत. सामन्यात विजय मिळवण्यासाठी इंग्लंडला शेवटच्या दिवशी अजून ३८६ धावांची आवश्यकता आहे, तर सामना अनिर्णीत करण्यासाठी पाचवा दिवस संपेपर्यंत इंग्लंडच्या खेळाडूंना खेळपट्टीवर टिकून राहावे लागेल.
महत्वाच्या बातम्या –
क्रिकेटवेडा स्मिथ! रात्रीच्या १ वाजता नवीन बॅटने करत होता शॅडो प्रॅक्टिस, पत्नीने व्हिडिओ केला शेअर
माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू म्हणतोय, “आता भारतीय बोलतील आमच्याकडे बाबर आणि रिझवान नाहीत”