ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (AUS vs ENG) यांच्यात ऍशेस मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना (Fifth Test) होबार्ट येथे सुरू आहे. दिवस-रात्र स्वरुपात खेळल्या जात असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाला भक्कम सुरुवात करून देण्याची जबाबदारी दोन जुन्या मित्रांवर होती (Childhood Friends). परंतु ते मित्र ऑस्ट्रेलिया संघाला चांगली सुरुवात करून देण्यात अपयशी ठरले आहेत. हे मित्र आहेत, डेविड वॉर्नर (David Warner) आणि उस्मान ख्वाजा (Usman Khawaja).
ऍशेस मालिका खिशात घातलेल्या यजमान ऑस्ट्रेलिया संघाने पाचव्या कसोटीत नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी निवडली होती. या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स याने नवीन सलामी जोडी आजमावण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्याची ही योजना अपयशी ठरली आणि केवळ ३ धावांवर वॉर्नर आणि ख्वाजाची नवी सलामी जोडी तुटली. वॉर्नर २२ चेंडूंचा सामना करताना एकही धाव न करता ऑली रॉबिन्सनच्या गोलंदाजीवर झॅक क्राउलीच्या हाती झेल देत बाद झाला. वॉर्नरनंतर ख्वाजाही वैयक्तिक ६ धावांवर पव्हेलियनला परतला.
वॉर्नर आणि ख्वाजामध्ये आहे बालपणीची मैत्री
वॉर्नर आणि ख्वाजा, ऑस्ट्रेलियाने उरतवलेल्या या नव्या सलामी जोडीमध्ये फार पूर्वीपासूनचे नाते आहे. या सामन्यापूर्वीच वॉर्नरने आपल्या ख्वाजामधील नात्याचा खुलासा केला होता. वॉर्नरने ९० च्या दशकातील दोघांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत आपण बालपणीपासूनचे मित्र असल्याचे सांगितले होते. या फोटोत ते दोघे सोबत क्रिकेटचा सराव करताना दिसत आहेत.
https://www.instagram.com/p/CYqpenur9Uj/?utm_source=ig_web_button_share_sheet
ट्रॅविसच्या शतकामुळे ऑस्ट्रेलियाच्या २४१ धावा
दरम्यान सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, ऑस्ट्रेलिया संघाच्या खराब सुरुवातीनंतर ट्रॅविस हेड याच्या शतकी खेळीने संघाचा डाव सावरला. ट्रॅविसने ११३ चेंडूंचा सामना करताना १०१ धावांची शानदार खेळी केली. त्याच्या साथीला येत कॅमरॉन ग्रीनने ७४ धावा जोडल्या. तसेच मार्नस लाब्यूशेनच्या ४४ धावांच्या योगदानामुळे ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या दिवशी ५९.३ षटकात ६ विकेट्सच्या नुकसानावर २४१ धावा फलकावर लावल्या आहेत. ऍलेक्स कॅरी आणि मिचेल स्टार्क मैदानावर फलंदाजी करत आहेत.
इंग्लंडकडून वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड आणि ऑली रॉबिन्सन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या आहेत. तर मार्क वूड आणि ख्रिस वोक्स यांनी एका विकेटचे योगदान दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
किती गोड!! पॅव्हेलियनमध्ये परतताना विराटची वामिकासोबत मस्ती, व्हिडिओ व्हायरल
केकेआरला मिळाला नवा ‘गोलंदाजी गुरु’; भारतीय क्रिकेटसाठी दिलेय अतुल्य योगदान
रोहितपासून ते तेंडूलकरपर्यंत, सर्वांनीच थोपटली रिषभ पंतची पाठ; पाहा दिग्गजांचे खास ट्वीट्स
हेही पाहा-